डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात रक्तदानाद्वारे छत्रपती शंभूराजे यांना अभिवादन

मे 14, 2025 5:02 PM

१०१ दात्यांचे रक्तदान ; शिबिराला उत्स्फुर्त प्रतिसाद

raktadan godavari

जळगाव लाईव्ह न्यूज । येथील डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयातर्फे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमीत्त आयोजित रक्तदान शिबीराला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. या शिबीरात १०१ दात्यांनी रक्तदान करून छत्रपती संभाजी महाराज यांना अभिवादन केले.

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात उत्साहात साजरी करण्यात आली. छत्रपती शंभूराजे यांच्या जयंतीनिमीत्त वैद्यकीय महाविद्यालयाच्या डॉ. एन.एस. आर्विकर सभागृहात रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. वैद्यकीय महाविद्यालयाचे संचालक डॉ. एन.एस. आर्विकर, डीन डॉ. प्रशांत सोळंके, डॉ. प्रिती सोळंके, रजीस्ट्रार प्रमोद भिरूड यांनी रक्तदान करून शिबीराचे उद्घाटन केले. यावेळी विद्यार्थ्यांसह १०१ दात्यांनी रक्तदान करून छत्रपती संभाजी महाराज यांना अभिवादन केले.

शिबीराच्या यशस्वीतेसाठी विद्यालयाचे जनरल सेक्रेटरी शिवराज दाभाडे, डॉ. श्रृती बियाणी, डॉ. आदित्य निरवळ, श्रेया स्वामी, वैभव पाटील, मोहीत पाटील यांच्यासह रक्तसंकलनासाठी रक्तपेढीचे समन्वयक लक्ष्मण पाटील, सय्यद शेख, भावेश शेळके, सनी निकुंभ, सुहानी गजभिये, मोनिका आठवले, आकांक्षा भगत यांनी परिश्रम घेतले.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment