जळगाव लाईव्ह न्यूज । २३ डिसेंबर २०२१ । राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा वाढदिवस नुकताच पार पडला. या वाढदिवसाचे औचित साधत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे.तसेच राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसच्या वतीने एका आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मायोका अर्थात महाराष्ट्र युथ कार्निवल असे या उपक्रमाचे नाव असून या माध्यमातून राज्यातील प्रत्येक जिल्हयात आणि मुंबई शहरात विविध सांस्कृतिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

सविस्तर असे की, राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस रोहन सोनवणे, शहराध्यक्ष अक्षय पंजारी यांनी सांगितले की, ज्याप्रकारे आदरणीय साहेबांनी सामान्य घटकाला कायमच केंद्रस्थानी ठेवून महाराष्ट्राचा विकास केला. समाजाभिमुख धोरणे आमलात आणली. त्याच विचारांचा वारसा डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी विद्यार्थी कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल गव्हाणे यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष विद्यासागर पुगे, प्रदेश सरचिटणीस रोहन सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम संपूर्ण जिल्हयात आणि शहरात आम्ही राबवणार आहोत.

सबंध महाराष्ट्रातील ग्रामीण भागात छोट्या छोट्या शहरात प्रचंड गुणवान व कला-कौशल्य असलेले असंख्य विद्यार्थी व युवक आहेत. या सर्वाच्या गुणवत्तेला त्याच्याकडे असलेल्या कलेला प्रत्येकवेळी व्यासपीठ मिळेल असे नाही, त्यासाठी शरद पवार साहेबांच्या व्या वाढदिवसाये औचित्य साधून महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने अशा सर्व युवक, विद्याथ्यांच्या अंगी असलेल्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी व प्रोत्साहन देण्यासाठी संबंध महाराष्ट्रभर ‘Maharashtra Youth Carnival अर्थात MAYOCA या यूथ फेस्टिवलचे आयोजन केले जाणार आहे.
या फेस्टिवल अंतर्गत वैयक्तिक गायन, वैयक्तिक नृत्य, समूह नृत्य, चित्रकला, मॉडेलिंग या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात मुंबईसह राज्यातील प्रत्येक जिल्हयात प्रत्यक्ष निवड चाचणी होणार असून निवड झालेल्या स्पर्धकाना विभाग स्तरावरील उपांत्य फेरीत प्रवेश मिळणार आहे. अंतिम फेरी मुंबई येथे होणार असून या स्पर्धेच्या माध्यमातून राज्यातील विविध विभागातील विविध स्तरावरील विजेत्या स्पर्धकांना एकूण तब्बल २५ लाख रुपयांची बक्षिसे देण्यात येणार आहेत. स्पर्धेची नोंदणी १२ डिसेंबर पासून सुरु होत असून संपूर्ण नोंदणी प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने होणार आहे.
या माध्यमातून महाराष्ट्राच्या गाव खेड्यातील आणि छोट्या शहरातील जगासमोर न आलेल्या गुणवान कलाकारांना प्रोत्साहन मिळणार आहे. २५ डिसेंबर नंतर जिल्हयात शहरात या स्पर्धेची निवड चाचणी होणार आहे. जिल्हास्तरावरील निवडचाचणी मध्ये निवडलेल्या स्पर्धकांना नागपूर विभागीय उपात्य फेरीत प्रवेश मिळणार असून त्यामधून राज्यपातळीवर स्पर्धेत प्रवेश मिळेल. विद्यार्थी व युवकांनी या स्पर्धेत जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे आवाहन महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी विदयार्थी काँग्रेस करीत आहे.
स्पर्धेची संपूर्ण माहिती व तपशील www.nscmayora.com या संकेत स्थळावर उपलब्ध आहे.
हे देखील वाचा :
- डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयात बी.एस्सी. (ऑनर्स) अॅग्रीकल्चर प्रवेश प्रक्रिया सुरू
- NEET नंतर आता महाराष्ट्रातही पेपरफुटीचा स्फोट; उद्या होणारी ‘महा-टीईटी’ परीक्षा तडकाफडकी रद्द!
- १२ वी नंतर यांत्रिकी अभियांत्रिकीची निवड ठरू शकते उज्ज्वल करिअरची गुरुकिल्ली – डॉ. तुषार कोळी
- जळगावातील १२ केंद्रांवर नीटची फेरपरीक्षा शांततेत; परीक्षा केंद्रांवर पोलीस बंदोबस्त !
- अखेर मोठी घोषणा! पेपरफुटीमुळे रद्द झालेली ‘नीट’ परीक्षेची नवीन तारीख जाहीर; कधी होणार जाणून घ्या?







