अमळनेर कन्या शाळेत “उमलती कळी” विषयावर प्रबोधन

डिसेंबर 22, 2021 12:36 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ डिसेंबर २०२१ । मराठा सेवा संघ प्रणित, संत गाडगे महाराज प्रबोधन परिषद व नीमा फॉउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने अमळनेर येथील श्रीमती द्रौपदाबाई रामचंद्र शेठ कन्या शाळेत “उमलती कळी” या विषयावर विद्यार्थिनींचे प्रबोधन करण्यात आले.

amalner shala jpg webp

यावेली कार्यक्रमाची सुरुवात जिजाऊ वंदनेने झाली. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून निमा संघटनेच्या जेष्ठ सदस्या डॉ. अंजली चव्हाण, डॉ.लिना चौधरी उपस्थित होत्या तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका जयश्री सोनवणे तर मंचावर संत गाडगे महाराज प्रबोधन परिषदेच्या जिल्हा अध्यक्षा वैशाली शेवाळे व तालुकाध्यक्षा वर्षा पाटील तसेच सर्व सदस्य उपस्थित होते.

दरम्यान, डॉ.लीना चौधरी यांनी मुलींना हार्मोन्स च्या बदलामुळे उदभवणाऱ्या आरोग्य समस्या विषयी माहिती दिली. वैशाली शेवाळे यांनी यामुळेच होणारे मानसिक असमतोल व होणारे बदल याबाबत माहिती दिली. सदर कार्यक्रम संत गाडगे महाराज प्रबोधन परिषदेच्या प्रदेश कार्याध्यक्ष प्रा.वैशाली पाटिल याच्या मार्गदर्शनाने घेण्यात आला. सूत्रसंचालन विद्या पाटील तर आभार प्रदर्शन वर्षा पाटील यांनी केले. यावेळी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

हे देखील वाचा :

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now