दोन अल्पवयीन मुलींना फूस लावून पळविले!

डिसेंबर 19, 2021 10:28 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ डिसेंबर २०२१ । शहरातून दोन वेगवेगळ्या घटनेत दोन अल्पवयीन मुलींना फूस लावून पळवून नेल्याची घटना उघडकीस आली असून याप्रकरणी एमआयडीसीसह रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

crime 1 2

याबाबत सविस्तर वृत्त असे की, मेहरूण परिसरातील पंधरा वर्षीय मुलगी ही शुक्रवारी सायंकाळी आजीकडे आली आली होती. तिला कुणी तरी फूस लावून पळवून नेले. मुलीच्या आईच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आहे.
दुसऱ्या घटनेत शिवकॉलनी परिसरातील सोळा वर्षीय मुलीसही कुणीतरी फूस लावून पळवून नेले. ही घटना शुक्रवारी रात्री घडली. याप्रकरणी रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकाच दिवशी दोन मुलींना पळवून नेल्याने खळबळ उडाली आहे.

चेतन वाणी

पत्रकारिता क्षेत्रात गत ११ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now