जिल्हा माहिती कार्यालयातील सिनेयंत्रचालक दिलीप खैरनार सेवानिवृत्त

नोव्हेंबर 30, 2021 7:38 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० नोव्हेंबर २०२१ । जिल्हा माहिती कार्यालयातील सिनेयंत्रचालक दिलीप शिवराम खैरनार हे मंगळवार दि.३० रोजी ३५ वर्षाच्या प्रदिर्घ शासकीय सेवेनंतर नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले.

Retire jpg webp

सेवानिवृत्तीनिमित्त श्री. खैरनार यांना जिल्हा माहिती कार्यालयातर्फे स्नेहपुर्ण निरोप देण्यात आला. त्यांना जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत आणि माजी जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके यांनी भावी आयुष्यासाठी सदिच्छा दिल्या. तसेच जिल्हा माहिती कार्यालयातील विनोद पाटील यांनी श्री. खैरनार यांना शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सदिच्छा दिल्या.

यावेळी जिल्हा माहिती कार्यालयातील कर्मचारी उषा लोखंडे, पंकज ठाकूर यांच्यासह कार्यालयाचे सेवानिवृत्त कर्मचारी रामकृष्ण कोळी उपस्थित होते. श्री. खैरनार यांनी डिसेंबर १९८५ मध्ये प्रकर्षित प्रसिद्धी पथक, नंदुरबार येथे आपल्या शासकीय सेवेस प्रारंभ केला. त्यानंतर त्यांनी जिल्हा माहिती कार्यालयाच्या जळगाव, नाशिक येथे काम केले.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now