बाल संरक्षण समितीच्या अशासकीय सदस्यपदी फिरोज शेख

नोव्हेंबर 21, 2021 3:53 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ नोव्हेंबर २०२१ । जळगाव जिल्हा बाल संरक्षण समिती नुकतीच गठीत करण्यात आली असून या समितीच्या अशासकीय सदस्यपदी मौलाना आझाद फाऊंडेशनचे अध्यक्ष फिरोज शेख यांची निवड करण्यात आली आहे.

Firoj shaikh jpg webp

बालन्याय अधिनियम २०१५ च्या कलम ४४ आणि ४५ तसेच नियम २०१८ मधील २५ नुसार प्रतिपालकत्व, २६ नुसार प्रायोजकत्व या योजनेबाबत तरतूद केली आहे. योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरावर प्रतिपालकत्व, प्रायोजकत्व तसेच अनुरक्षणगृह या संस्थेत्तर सेवांच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने पुणे आयुक्त यांच्या निर्देशानुसार जिल्हाधिकार्‍यांच्या मान्यतेने नुकतीच समिती गठीत केली आहे. त्यात अध्यक्ष, तीन सदस्य, दोन अशासकीय सदस्य तसेच सदस्य सचिवाचा समावेश आहे.

समितीत मौलाना आझाद अल्पसंख्याक समाज विकास फाउंडेशनचे अध्यक्ष फिरोज रफिक शेख यांची अशासकीय सदस्यपदी नुकतीच निवड करण्यात आली आहे. सामाजिक क्षेत्रातील कार्याची दखल घेवून त्यांची निवड करण्यात आली आहे. त्यांना जिल्हा बाल संरक्षण समिती तथा जिल्हाधिकारी यांच्या स्वाक्षरीचे नियुक्ती पत्रही प्राप्त झाले आहे. त्यांच्या या निवडीबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now