परप्रांतीय तरुणाने अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले

नोव्हेंबर 2, 2021 12:51 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २ नोव्हेंबर २०२१ । मूळ उत्तरप्रदेशातील व सध्या जळगावात वास्तव्यास असलेल्या तरुणाने एका अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Untitled design 15 jpg webp

अजय पप्पु सोनकर (रा.करंदा, ता.मडीहान, जि. मिर्झापूर, उत्तरप्रदेश, ह.मु.आर.एन.दुध संकलन केंद्र, जळगाव) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित तरुणाचे नाव आहे. आव्हाणे शिवारातील रेल्वे लाईन जवळील आर.एन.दुध संकलन केंद्राजवळ १४ वर्षीय मुलगी आपल्या कुटुंबियांसह राहते. २४ ऑक्टोंबर रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास राहत्या घराजवळून या तरुणाने अल्पवयीन तरुणीला फूस लावून पळवून नेल्याचा आरोप आहे. याप्रकरणी पीडीत मुलीच्या वडीलांच्या फिर्यादीवरून जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हवालदार अनिल तायडे करीत आहेत.

चेतन वाणी

पत्रकारिता क्षेत्रात गत ११ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now