धक्कादायक.. बेपत्ता चिमुकल्या भावंडांचे मृतदेह आढळले विहिरीत

ऑक्टोबर 28, 2021 6:08 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ ऑक्टोबर २०२१ । आई-वडिलांसोबत शेतात गेलेली दोन्ही मुले बेपत्ता झाल्याची घटना बुधवार दि.२७ रोजी चुंचाळे (ता.यावल) येथे घडली होती. दरम्यान, गुरुवार दि.२८ रोजी या दोन्ही भावंडांचा मृतदेह त्यांच्याच शेतातील विहरीत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी यावल पोलिसात एकास चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

child boy jpg webp

यावल तालुक्यातील चुंचाळे येथील गायरान परिसरातील रहिवासी रवींद्र मधुकर सावळे (वय-३५) आणि उज्ज्वला सावळे हे दाम्पत्य बुधवार दि.२७ रोजी त्यांची दोन्ही मुले रितेश (वय-४) आणि हितेश (वय-३) यांना घेऊन त्यांच्या स्वत:च्या चुंचाळे शिवारातील गट नं. ३६५/१ मधील शेतात गेली होती. सावळे दाम्पत्य शेतात काम करत असतांना ही दोन्ही मुले खेळत असल्याने कुणी त्यांच्याकडे लक्ष दिले नाही. यादरम्यान दोन्ही मुले बेपत्ता झाले होते. या दोन्ही भावंडांचा चुंचाळे शिवारासह नायगाव, सौखेडासीमसह पंचक्रोशीत शोध घेण्यात आला. परंतू ते कुठेही आढळून न आल्याने याबाबत रात्री उशिरा यावल पोलीसात बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली होती. दरम्यान, गुरूवारी २८ रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास त्याच शेतातील विहिरीत या दोघं भावंडांचा मृतदेह तरंगतांना आढळून आल्याचे गावात एकच खळबळ उडाली आहे.

चुलत काकाला घेतले ताब्यात
घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी विहिरीजवळ प्रचंड आक्रोश केला होता. यावल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र खैरनार, सहाय्यक फौजदार विजय पाचपोळ आदींनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. दरम्यान, मयत झालेल्या बालकांचा चुलत काका हा मनोरूग्ण असल्याने त्यानेच दोघांना विहिरीत फेकल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे यावल पोलीसांनी त्यांच्या चुलत काकाला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

चेतन वाणी

पत्रकारिता क्षेत्रात गत ११ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now