⁠ 
मंगळवार, एप्रिल 30, 2024

वयाच्या तेवीशीत रक्ताचा कॅन्सर, एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरने युवा अभियंत्‍याचे फुलविले जीवन

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ ऑक्टोबर २०२१ । आईच्या उतारवयात तिचा आधार असलेल्या तरुण तेवीस वर्षीय युवा अभियंता अचानक एकेदिवशी तापाने फणफणतो. अंगदुखीसह अन्‍य कारणांनी वैद्यकीय तपासणी केली असता रक्‍ताचा कर्करोग असल्‍याचे निदान होताच त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. डोळ्यासमोर अंधारी आली. अशातच त्याला एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरची माहिती मिळते आणि तो तिथे पोहचतो. हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु केले. दुर्मिळ अशा ‘ब्लास्टिक प्लास्मासायटॉइड डेंड्रिटिक सेल निओप्लाझम’वर त्‍याने यशस्‍वीरीत्‍या मात केली असून, उपचारानंतर जीवन जगण्याची नवी उमेद घेऊन घरी परतला आहे.
एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरचे हेमॅटोलॉजिस्ट व बोन म्यारो ट्रान्सप्लांट स्पेशलीस्ट डॉ.रजत बजाज व डॉ.सुदर्शन पंडित यांनी यासंदर्भात जळगाव लाईव्हला अधिक माहिती दिली आहे. डॉ. रजत बजाज म्‍हणाले, की आजवर रुग्‍णालयात चाळीसहून अधिक बोरमॅरो ट्रासप्‍लांट (मज्‍जारज्‍जू प्रत्‍यारोपण शस्‍त्रक्रीया) यशस्‍वीरीत्‍या पार पडल्‍या आहेत. परंतु २३ वर्षीय युवकाची घटना दुर्मिळ अशी होती. तो कुटुंबातील एकुलता कमावता पुरुष व त्‍याच्‍यावरच ज्‍येष्ठ नागरीक आईची जबाबदारी होती. ताप, अंगदुखीसह अन्‍य व्‍याधींमुळे तपासणीसाठी आल्‍यानंतर आढळलेल्‍या लक्षणांमुळे उत्तरीय वैद्यकीय तपासणीचा सल्‍ला दिला. त्‍यात त्‍याला रक्‍ताचा कर्करोग झाल्‍याचे निदान झाले. ‘ब्लास्टिक प्लास्मासायटॉइड डेंड्रिटिक सेल निओप्लाझम’ अत्‍यंत दुर्मिक व्‍याधी असून, एक कोटी व्‍यक्‍तींमध्ये एखाद्या व्‍यक्‍तीमध्ये उद्भवते. दुर्मिळ व्‍याधी असल्‍याने सहाजिकच ठरविलेली साचेबद्ध उपचारपद्धती कोठेही उपलब्‍ध नाही. असे असले तरी केमोथेरपी व बोनमॅरो ट्रान्‍सप्‍लांटच्‍या माध्यमातून उत्तम उपचार करता येतात. त्‍यानुसार यावर्षी जानेवारीत निदान झाल्‍यानंतर तातडीने उपचाराला सुरवात केली. केमो थेरपी दिल्‍यानंतर वैद्यकीय सुधारणा होत गेल्‍या.
चुलत बहिणीने दिला मदतीचा हात

कुटुंबात कुणीच सदस्‍य नसल्‍याने स्‍टेमसेलकरीता डोनर रजिस्‍ट्रीच्‍या माध्यमातून दात्‍याचा शोध घेण्यात आला. अथक प्रयत्‍नांतून दाता उपलब्‍ध झाला. मात्र शस्त्रक्रियेच्या आधी दात्‍याला कोरोनाची लागण झाल्‍याने त्‍याने स्‍टेमसेल देण्यास नकार दिला. या आव्‍हानात्‍मक परिस्थितीत सुदैवाने चुलत बहिणीचे वैद्यकीय नमुने जुळले. व तिच्‍या माध्यमातून रुग्‍णाला स्‍टेमसेल उपलब्‍ध झाले. नुकताच यशस्‍वी उपचारादरम्‍यान रुग्‍णाला घरी सोडले असून, आता तो सामान्‍य जीवन जगू शकणार असल्‍याचे डॉ.रजत बजाज यांनी सांगितले. रुग्‍णालयातील

उत्तर महाराष्ट्रातील एकमेव हॉस्पिटल
युवा अभियंत्याच्या जीवनात डॉ.रजत बजाज, डॉ.सुदर्शन पंडित, सहाय्यक सचिन राठोड यांच्‍यासह टीमच्‍या अथक परीश्रमातून नवी उमेद निर्माण झाली आहे.. कोविड काळात ४० बोन मॅरो ट्रान्सप्लांट करणारे एच सी जी मानवता कॅन्सर सेन्टर हे उत्तर महाराष्ट्रातील अद्यावयात एकमेव हॉस्पिटल आहे.