कोरोनाच्या काळात दाखविलेली एकी कायम टिकवून ठेवा : महापौर जयश्री महाजन

ऑक्टोबर 17, 2021 2:22 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ ऑक्टोबर २०२१ । जळगाव शहर कोरोना महामारीच्या संख्येबाबत शून्य आहे. हे शून्य कायम ठेवून शहर कोरोनामुक्त करायचे आहे. कामगार बांधवांनी नेहमी आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. एखादे संकट आले की आपण एकत्र येऊन लढा देतो. त्याचा सामना करतो व संकट परतवतो, हे कोरोनाच्या दोन्ही लाटेत दिसून आले आहे. हीच एकी कायम टिकवून ठेवायची आहे, असे आवाहन महापौर जयश्री महाजन यांनी केले.

vaccination jpg webp

‘मिशन कोरोनामुक्त जळगाव’ अंतर्गत क्रेडाई जळगाव व जळगाव सिव्हिल इंजिनिअर्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने व जळगाव शहर महानगरपालिकेच्या सहकार्याने बांधकाम क्षेत्रातील कामगार व परिवारातील सदस्यांकरता शहरातील नानीबाई रुग्णालय व चेतनदास मेहता रुग्णालयात मोफत लसीकरण शिबिराचे आयोजन रविवार दि.१७ रोजी करण्यात आले होते. या शिबिराचे उदघाटन महापौर जयश्री महाजन यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी क्रेडाई, महाराष्ट्रचे सहसचिव अनिष शाह, जळगांवचे अध्यक्ष हातीम अली, सचिव दीपक सराफ, जळगाव सिव्हिल इंजिनिअर्स असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष भरत अमळकर, असोसिएशनचे सचिव मिलिंद काळे, प्रकल्प प्रमुख तुषार तोतला आदी उपस्थित होते.

पुढे बोलतांना महापौर महाजन म्हणाले की, कोरोना महामारी होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक लस घेणे महत्वाचे आहे. बांधकाम कामगार हा घटक अनेकदा स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसते. कोरोना महामारीच्या काळात बांधकाम कामगार बांधव अधिक भरडला गेला. मात्र ‘क्रेडाई’सारख्या सामाजिक संस्थांच्या मदतीने त्यांना मदत झाली, असेही महापौर म्हणाल्या.

यावेळी रुग्णालयातील डॉ. सोनल कुलकर्णी, अधिपरिचरिका शोभा कोगदे, शिवानी परदेशी, कर्मचारी शीतल पाटील, सुनंदा चौधरी, लक्ष्मीबाई हंसकर, कल्याणी वर्दे, जयश्री चव्हाण यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रस्तावनेत प्रकल्प प्रमुख तुषार तोतला यांनी कार्यक्रम घेण्यामागील उद्देश स्पष्ट केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश कुलकर्णी यांनी केले तर आभार तुषार तोतला यांनी मानले. यशस्वीतेसाठी क्रेडाई संस्थेचे माजी अध्यक्ष निर्णय चौधरी, क्रेडाई वुमन्स विंगचे अध्यक्ष सुचिता चौधरी, श्रुती शहा, रुपाली चौधरी, निकिता खडके, ऍड.पुष्कर नेहेते, ललित भोळे, चंद्रकांत पाटील, प्रथमेश सैनी, चंदन कोल्हे, जितेंद्र लाल, जितेंद्र राठी, सचिन धांडे, निलेश पाटील आदींनी परिश्रम घेतले.

चेतन वाणी

पत्रकारिता क्षेत्रात गत ११ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now