⁠ 
रविवार, नोव्हेंबर 24, 2024
Home | हवामान | जळगाव जिल्ह्यात पुढील दोन दिवसात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची शक्यता

जळगाव जिल्ह्यात पुढील दोन दिवसात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची शक्यता

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ ऑक्टोबर २०२१ । जळगाव जिल्ह्यातील काही ठिकाणी 16 व 17 ऑक्टोबर, 2021 रोजी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शेतकरी, नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन कृषि विभागातर्फे करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील शेतमालाची काढणी करावी व शेतात साठवणूक केलेला शेतमाल सुस्थितीत योग्य ठिकाणी ठेवावा. जेणेकरुन वरील कालावधीत होणाऱ्या वादळी वारा, अवकाळी पावसापासून शेतमालाचे संरक्षण करणे सोयीचे होईल, असेही जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांनी प्रसिध्दीस दिलेल्या शासकीय पत्रकात म्हटले आहे.

दरम्यान, आज जळगाव जिल्ह्याला यलो अलर्ट देण्यात आला आहे. जिल्ह्यात मागील जवळपास दीड महिन्यांपासून पाऊस कोसळत आहे. सुरुवातीला मान्सूनने जिल्ह्याकडे पाठ फिरवल्याने शेतकरी वर्ग संकटात आला होता. परंतु गेल्या काही दिवसापासून पाऊस कोसळत असल्याने आता शेतकऱ्यांसमोर पिकांच्या नुकसानीचे संकट उभे आहे.

आधीच पावसाने पिकांचे नुकसान झाले आहे. त्यात उरले-सुरले पीक हाती येणार असे शेतकऱ्यांना वाटत असताना आता आणखी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आल्याने उरले-सुरले पीकही वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये आहे. जिल्ह्यातील काही ठिकाणी 16 व 17 ऑक्टोबर, 2021 रोजी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शेतकरी, नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन कृषि विभागातर्फे करण्यात आले आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.