आजचा पेट्रोल-डिझेलचा भाव जाहीर ; वाचा जळगावातील प्रति लिटरचा दर

ऑक्टोबर 14, 2021 12:42 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ ऑक्टोबर २०२१ । गेल्या काही दिवसापासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होत आहे. त्यामुळे देशभरातील अनेक शहरांमध्ये पेट्रोल पाठोपाठ डिझेल दराने शंभरी गाठली आहे. दरम्यान, आज पेट्रोलियम कंपन्यांकडून पेट्रोल आणि डिझेल चा दर जाहीर करण्यात आला असून आज कोणताही बदल झालेला नाही. आज पेट्रोल आणि डिझेल चा दर स्थिर आहे.

petrol diesel

आधीच पेट्रोलने दराने शंभरी पार केली असता आता त्यात डिझेलच्या दरानेही शंभरी गाठली आहे. जळगाव मध्ये आज प्रति लिटर डिझेलचा दर १००.६२ रुपये इतके आहे. तर पेट्रोल प्रति लिटर १११.५९ रुपये प्रति लिटर इतके आहे.

जळगावमध्ये गेल्या १२ दिवसात पेट्रोल जवळपास २.५० रुपयाने महागले आहे. १ जानेवारी २०२१ रोजी पेट्रोल दर प्रति लिटर ९१ रुपयापर्यंत होते. ते आज १११ रुपयांवर गेले आहे. म्हणजेच गेल्या १० महिन्यात पेट्रोल दर २० रुपयाने महागले आहे. तर दुसरीकडे ऑक्टोबरमध्ये डिझेल ३.३० रुपयांनी महागले आहे. २०२१ सुरवातीला डिझेल चा दर ८० रुपये होता. तो आता ९९ रुपयांवर गेला आहे. म्हणजेच डिझेलच्या दरात देखील गेल्या १० महिन्यात २० रुपयाची वाढ झाली.

आधीच महागाईचा भडका उडाला असता त्यात पेट्रोल आणि डिझेल च्या किंमती सतत वाढत आहे. त्यामुळे सामान्यांच्या खिशाला झळ बसत आहे. बजेट कोलमडून महिन्याच्या खर्चात सरासरी वीस टक्के वाढ झाली आहे. इतिहासात पहिल्याच पेट्रोल आणि डिझेलचा भाव शंभरी पार गेला आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now