‘खान्देशातील आंबेडकरी चळवळ’ ग्रंथाचे प्रकाशन व चर्चासत्राचे १७ रोजी आयोजन

ऑक्टोबर 14, 2021 1:04 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ ऑक्टोबर २०२१ । चाळीसगाव येथील समाज प्रबोधीनी बहुउद्देशीय संस्थेच्यावतीने ‘खान्देशातील आंबेडकरी चळवळ खंड-१’चे प्रकाशन व ‘आंबेडकरी चळवळ काल, आज आणि उद्या’ या विषयावर चर्चासत्राच्या कार्यक्रमाचे आयोजन रविवार दि.१७ रोजी करण्यात आले आहे.

Untitled design 47 jpg webp

चाळीसगाव येथील समाज प्रबोधीनी बहुउद्देशीय संस्थेच्यावतीने धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त रविवार दि.१७ रोजी सकाळी १० वाजता राजपूत मंगल कार्यालय येथे ‘खान्देशातील आंबेडकरी चळवळ खंड-१’ या ग्रंथाचे प्रकाशन व ‘आंबेडकरी चळवळ काल, आज आणि उद्या’ या विषयावरील चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबई येथील जेष्ठ आंबेडकरी विचारवंत तथा लेखक ज.वि. पवार(मुंबई) यांच्या हस्ते व मुंबई येथील विचारवंत सुबोध मोरे यांच्या अध्यक्षतेखाली व पाचोरा येथील प्राचार्य डॉ. भी.ना. पाटील या प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत ‘खानदेशातील आंबेडकरी चळवळ खंड -१’ या ग्रंथाचे प्रकाशन करण्यात येणार आहे. प्रा. गौतम निकम, प्रा.डॉ. सतीश मस्के, डी.एस. घोडेस्वार, प्रतापराव सांळुखे, बाबुराव वाघ व कल्पतेश देशमुख यांनी या पुस्तकाचे संपादन केले आहे.

दुपारच्या सत्रात ‘उद्याची आंबेडकरी चळवळ’ या संदर्भातील काही महत्त्वाच्या प्रश्‍नावर चर्चासत्राचे आयोजनही करण्यात आले आहे. चर्चासत्रात कॉ.सुबोध मोरे(मुंबई), प्रा.डॉ. देवेंद्र इंगळे (जळगाव), दिलीप चव्हाण, प्रा.डॉ. राजश्री पगारे (नाशिक), प्रा.डॉ. संबोधी देशपांडे ( चोपडा), प्रा.डॉ. देवकुमार अहिरे( पुणे) आदी मान्यवर सहभागी होणार आहेत. कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन समाज प्रबोधीनी बहुउद्देशीय संस्थेतर्फे करण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now