पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचा सर्व्हे करून नुकसानभरपाई मिळावी; राष्ट्रवादीची मागणी

सप्टेंबर 17, 2021 4:45 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ सप्टेंबर २०२१ । गेल्या महिन्याभरापासून जिल्ह्यात मोठया प्रमाणात पर्जन्यवृष्टी झाली आहे. त्यामुळे शेतांमध्ये मध्ये पाणी साचले असून त्यामुळे मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले आहे त्याचे सर्व्हे करून नुकसानभरपाई मिळावी, अशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष रविंद्रभैय्या पाटील आणि जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे खेवलकर यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांचेकडे निवेदनाद्वारे केली आहे.

New Project 2 1

जळगाव जिल्हयात गेल्या महिन्या भरापासून मोठया प्रमाणात पर्जन्यवृष्टी झाल्यामुळे  पिके पिवळी पडली असून त्यांची मुळे सडत आहेत. उडीद मुग ,सोयाबीनला कोंब फुटले आहेत तर कपाशीचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे त्यामुळे शेतकरी बांधवांच्या हाताशी आलेले पिक वाया गेले आहे. परिणामी शेतकरी बांधवांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी महसुल यंत्रणेला या नुकसानीचे सर्व्हे करण्याचे आदेश द्यावे व शासन दरबारी पाठपुरावा करून शेतकरी बांधवाना मदत मिळवून द्यावी असे या निवेदनात नमूद केले आहे

निवेदन देतांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष रविंद्रभैय्या पाटील आणि जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे खेवलकर यांचेसोबत  हरताळा सरपंच दिपक कोळी, उपसरपंच नामदेवराव भड, बोदवड उपनगराध्यक्ष दिनेश भाऊ माळी, गटनेते कैलास भाऊ चौधरी, नगरसेवक दिपक भाऊ झांबड, गोपाळ भाऊ गंगतिरे,रवींद्र भाऊ खेवलकर,प्रदिप बडगुजर,भरत अप्पा पाटील,मुकेश क-हाळे, भगतसिंग पाटील,शंकर चिखलकर, हमीद पठाण, महेश शेळके उपस्थित होते.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now