जळगावकरांसाठी आनंदाची बातमी : वाघूर धरण पूर्णपणे भरले

सप्टेंबर 17, 2021 1:22 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ सप्टेंबर २०२१ । जळगाव जिल्ह्यावर सुरुवातीला सुरलेल्या पावसाने मागील काही दिवसापासून दमदार हजेरी लावली. त्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश धरणातील पाणीसाठ्यात कमालीच वाढ झाली आहे. जळगाव शहराला पाणी पुरवठा करणारे वाघूर धरण पूर्णपणे भरले आहे. यामुळे जळगावकरांची आगामी वर्षासाठीची चिंता मिटली आहे.

waghur dam

जळगाव जिल्ह्यातील धरण परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे जिल्ह्यातील अभोरा, मंगरुळ, सुकी, तोंडापूर, बोरी, मन्याड ही पाच धरणे तुडूंब भरली आहेत.  वाघुर धरण देखील पूर्णपणे भरले आहे. आज वाघुर धरणाचा जलसाठा ९९.९३ टक्क्यावर आहे. धरण हे पूर्णपणे भरले असल्याने आता जळगावकरांच्या पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे. गेल्या आठवड्यातच महापौर आणि उपमहापौरांच्या उपस्थितीत वाघूर धरणाचे जलपूजन करण्यात आले होते. आता धरण पूर्ण भरल्याने एक दिवसाआड पाण्याचे नियोजन शक्य होणार आहे.

दरम्यान, वाघूर धरणातून आधी देखील चार गेट उघडून पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. मध्यंतरी गेट बंद करण्यात आले असले तरी आता धरण पूर्ण भरल्यामुळे यातून पाण्याची विसर्ग होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now