जळगाव शहर

जळगावात भाजप महिला मोर्चातर्फे साकडे आंदोलन

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ सप्टेंबर २०२१ । महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी महाविकास आघाडी सरकारला सद्बुद्धी देवो. यासाठी आज भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा यांनी पेट्रोल पंप साईबाबा मंदिर समोर रस्ता रोको आंदोलन करून विरोध प्रकट करण्यात आले. महिला आघाडी उपाध्यक्षा उज्वला बेंडाळे यांच्या नेतृत्वात दिप्ती ताई चिरमाडे अध्यक्षतेत महिला मोर्चा काढण्यात आला. यावेळी ठाकरे सरकारविरोधात घोषणाबाजी देण्यात आल्या.

राज्यात सात महिन्यात पाचशेपेक्षा महिलांवर अत्याचाराच्या घटना नोंदविल्या गेल्या असून अजूनही शासनाला जाग आलेली नाही व काहीही उपाययोजना करत नाही. महिलांच्या सुरक्षेसाठी दिशा कायदा सारखे कठोरनियम लागू करावा. सरकार योग्य उपाययोजना न केल्यास भाजपा महिला मोर्चा शांत बसणार नाही, तीव्र आंदोलन करू असे इशारा यावेळी देण्यात आला.

दोन वर्षे उलटूनही महाराष्ट्र शासनाने अजून पर्यंत महिला आयोग अध्यक्ष नेमणूक केली नाही व महिलांप्रती शासनाचा निष्काळजीपणा व असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले. जिथे मंत्र्यांवर अत्याचारांचे आरोप होत आहे असे लोक महिलांचं काय रक्षण करतील. यावेळी  जिल्हाध्यक्ष दीपक भाऊ सूर्यवंशी, सरचिटणीस डॉ राधेश्याम चौधरी, यांच्या मार्गदर्शनाखाली हा आंदोलन करण्यात आले असून नगरसेवक महेश चौधरी, मंडळ अध्यक्ष केदार देशपांडे, जिल्हा सहप्रसिद्धी प्रमुख धीरज वर्मा, मनोज (पिंटू) भाऊ काळे, मयुर कापसे, यूवा मोर्चा अध्यक्ष आनंद सपकाळे, जयंत चौहान, स्नेहा निंभोरे, रूपेश राणे, सनी पटेल, भुषण काकुस्ते उपस्थित होते.

दरम्यान, भारतीय जनता पार्टी महिला आघाडी तर्फे येथे नंदनवन कॉलनी मित्र मंडळ येथे श्री गणपती ची आरती महिला आघाडीतर्फे प्रदेश उपाध्यक्ष उज्वलाताई बेंडाळे, मा महापौर सीमाताई भोळे, जिल्हाध्यक्ष दीप्तीताई चिरमाडे, सरचिटणीस रेखाताई वर्मा, यांच्या हस्ते करण्यात आली. जिल्हा पदाधिकारी वंदना पाटील, रेखाताई पाटील, ज्योती ताई निंभोरे, पूजाताई चौधरी, नगरसेविका प्रतिभाताई कापसे, दीपमाळा ताई काळे, महिला आघाडी चे छाया सारस्वत, तृप्ती पाटील, व इतर महिला पदाधिकारी सहभाग नोंदविला

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button