मनपा उपायुक्त संतोष वाहुळेंची मुंबईला बदली

सप्टेंबर 1, 2021 6:24 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १ सप्टेंबर २०२१ । शहर महानगरपालिकेचे मुख्य लेखा परीक्षक तथा उपायुक्त संतोष वाहुळे यांची मुंबई येथे बदली झाली आहे. जळगावात अतिक्रमण आणि हॉकर्सबाबत त्यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे सिंघम अधिकारी अशी त्यांची ओळख निर्माण झाली होती.

santosh vahule

अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागात उपसंचालक, वित्तीय सल्लागार व उपसचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. बदलीचे आदेश बुधवारी महाराष्ट्र शासनाचे अवर सचिव माधवी गांधी यांनी काढले आहेत.

महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा उपसंचालक संवर्गातील राज्यातील ६ अधिकार्‍यांच्या बदल्या झाल्या आहेत. त्यात जळगाव महानगरपालिकेचे मुख्य लेखा परीक्षक संतोष वाहुळे यांचाही समावेश आहे.

जळगाव मनपात मुख्य लेखा परीक्षक म्हणून असलेले संतोष वाहुळे यांच्याकडे उपायुक्त पदाचा देखील पदभार होता. जळगाव शहरातील अतिक्रमण हटाव आणि हॉकर्सवर केलेल्या कारवाईने ते नेहमी चर्चेत राहिले होते. शहरातील गाळे सील करण्याच्या कारवाईत पुढाकार घेत असल्यानेच वाहुळे यांची बदली झाल्याचे बोलले जात आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now