जिल्हा बँक २५ रोजी सादर करणार प्रारूप मतदार यादी

ऑगस्ट 21, 2021 12:07 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ ऑगस्ट २०२१ । जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झालेली आहे. जिल्हा बँकेकडून प्रारूप मतदार यादी येत्या २५ ऑगस्ट राेजी जिल्हा सहकारी निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे सादर केली जाणार आहे. सहकारी विभागाकडून ही यादी प्राप्त झाल्यानंतर बँकेकडून पुन्हा सहकार विभागाला सादर केली जाणार आहे.

jalgaon jilha bank

बॅकेकडून २५ ऑगस्ट राेजी प्रारूप मतदार यादी निवडणुक निर्णय अधिकाऱ्यांना दिल्यानंतर ही यादी ३ सप्टेंबर राेजी प्रसिद्ध केली जाणार आहे. पुढील १० दिवसांमध्ये १३ सप्टेंबरपर्यंत या यादीवर हरकती मागवल्या जाणार आहेत. वेळेत येणाऱ्या हरकतींवर २२ सप्टेंबर पर्यंत सहकार निवडणुक निर्णय अधिकारी यांच्याकडे सुनावणी हाेईल.

हरकतीनंतर सुधारीत मतदार यादीला अंतीम रूप दिले जाईल. त्यानंतर २७ सप्टेंबर राेजी अंतीम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. मतदार यादीची प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतर पुढील ४५ दिवसांसाठी निवडणुक कार्यक्रम जाहीर हाेण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने राजकीय घडामाेडींना वेग आलेला आहे.

 

 

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now