पत्र्याच्या शेडमध्ये गळफास घेत वृद्धाची आत्महत्या

ऑगस्ट 17, 2021 11:24 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ ऑगस्ट २०२१ । शहरातील तांबापुरा परिसरात असलेल्या गवळी वाड्यातील एका वृद्धाने गोठ्यात आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली आहे.

IMG 20210817 WA0035 jpg webp

तांबापुरा परिसरात असलेल्या गवळी वाड्यात
अशोक कौतिक हटकर वय-६५ हे परिवारासह राहतात. मंगळवारी पहाटेच्या सुमारास त्यांनी घराजवळ असलेल्या चारा ठेवण्याच्या पत्र्याच्या शेडमध्ये गळफास घेत आत्महत्या केली. सकाळी म्हशींचे दूध काढण्यासाठी मुलगा गेला असता त्याला घडलेला प्रकार दिसून आला. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात नोंद करण्यात आली असून आत्महत्येचे नेमके कारण समजून आलेले नाही. अशोक हटकर यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, विवाहित मुली असा परिवार आहे.

 

चेतन वाणी

पत्रकारिता क्षेत्रात गत ११ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now