जळगाव जिल्हा

फत्तेपूर येथे डॉ. उल्हास पाटील होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजतर्फे आरोग्य तपासणी शिबिर

मोफत आरोग्य तपासणीसह होमिओपॅथिक औषधांचे वितरण; शासकीय आरोग्य योजनां बाबत मार्गदर्शन

जळगाव लाईव्ह न्यूज । ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासह आरोग्यविषयक जनजागृती करण्याच्या उद्देशाने डॉ. उल्हास पाटील होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, जळगाव यांच्या वतीने २८ ऑक्टोबर रोजी फत्तेपूर (ता. जामनेर) येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.

शिबिराचे उदघाटन भाजपचे जेष्ठ नेते श्री. जे. के. चव्हाण यांनी केले. या प्रसंगी डॉ. अरूण फिरके,बबलूशेठ भन्साळी, पंचायत समीती उपसभापती एकनाथ लोखंडे, उपसरपंच आत्माराम गावंडे, डॉ. सुराजसिंग पाटील, ग्रामपंचायत अधिकारी अमोल देशमुख व इतर मान्यवर उपस्थित होते. ग्रामस्थांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात हे शिबिर पार पडले.शिबिरात नागरिकांची आरोग्य तपासणी करून आवश्यकतेनुसार होमिओपॅथिक औषधांचे मोफत वितरण करण्यात आले.

तसेच आयुष्मान भारत योजना व अन्य शासकीय आरोग्य योजनांची माहिती देऊन पात्र रुग्णांना मोफत शस्त्रक्रिया व उपचारांचा लाभ मिळविण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले. ग्रामीण भागातील गरजू रुग्णांना योग्य उपचारांची माहिती मिळावी आणि आर्थिक अडचणींमुळे उपचारांपासून वंचित राहावे लागू नये, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश होता.या शिबिरात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विद्यानंद आठवले, प्रा. डॉ. सचिन पाटील, डॉ. विनायक विलायते, डॉ. सरगम सिंग, डॉ. तुबा नाझ व इंटर्न्स तसेच सह-इंटर्न्स यांनी सहभाग घेतला. वैद्यकीय पथकाने ग्रामस्थांना आरोग्यविषयक मार्गदर्शन केले.

शिबिराच्या यशस्वितेसाठी सरपंच सौ.पल्लवी सतीश पाटील, दत्तात्रय वसंत पाटील, सौ. रंजना दत्तात्रय पाटील, लोटूबा वसंतराव पाटील, सतीश हरिदास पाटील व कृष्णा पाटील यांनी सहकार्य केले. महाविद्यालयाच्या वतीने त्यांच्यासह सहकार्य करणार्‍या सर्व ग्रामस्थांचे आभार व्यक्त करण्यात आले.शिबिराच्या यशस्वीतेसाठी राजीव तायडे, पुंडलिक पाटील, प्रेम टेलर, प्रह्लाद पाटील, अनिल आप्पा, अरुण कोळी आदींनी परिश्रम घेतले.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button