रावेर

रावेरात रंगलेल्या भुलाबाई महोत्सवात २४ संघांचे दर्जेदार सादरीकरण

केशव स्मृती प्रतिष्ठान, डॉ केतकी पाटील फॉउंडेशन व रावेर नगरपालिकेचा स्तुत्य उपक्रम

जळगाव लाईव्ह न्यूज । रावेर नगरपालिकेच्या नगराध्यक्षा संगीता महाजन व सर्व नगरसेविका तसेच डॉ केतकी पाटील फाऊंडेशन यांच्या प्रयत्नातून व केशव स्मृती प्रतिष्ठान संचलित ललित कला संवर्धिनीतर्फे पहिल्यांदाच रावेर येथे भव्य भुलाबाई महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून लहान, मोठ्या व खुल्या गटातुन २४ संघानी एकाहून एक दर्जेदार सादरीकरण केले.

रावेर येथील नगरपालिकेच्या हॉल मध्ये गुरुवार दिनांक १ ऑक्टोबर रोजी भुलाबाई महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपच्या जेष्ठ पदाधिकारी रंजनाताई पाटील (मोरगाव) ह्या होत्या. त्यांच्या समवेत व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून रावेर नगरीच्या नगराध्यक्ष संगीता महाजन, दीपिका अग्रवाल, राष्ट्र सेविका समितीच्या कांता पटेल, परीक्षक पियुष रावळ, प्रान्जली रस्से, सचिन भिडे, डॉ पूजा महाजन ह्या होत्या. मान्यवरांच्या हस्ते भुलाबाईचे पूजन करून दीपप्रज्वलनासह भुलाबाईची आरती करण्यात आली. भुलाबाईची आरती मोनिका महाजन यांनी सादर केली.

New Project 8

मान्यवरांना शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह, पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी प्रास्ताविकातून गौरी जोशी यांनी भुलाबाई महोत्सव रावेर येथे घेण्यामागची भूमिका मांडून स्पर्धकांना शुभेच्छा दिल्यात. परिसरात भुलाबाई संस्कृतीचे महत्त्व अधोरेखित करणारे बॅनर लावण्यात आले होते. याप्रसंगी भाजप जिल्हा सरचिटणीस तथा डॉ केतकी पाटील फौंडेशन च्या संचालिका डॉ केतकी पाटील यांनी व्हिडीओ कॉलद्वारे संवाद साधून भुलाबाई महोत्सवास शुभेच्छा दिल्यात.

लहान गट, मोठा गट आणि खुला गट या प्रमाणे एकामागून एक अशा २४ संघानी सादरीकरण केले. परीक्षकांनी परीक्षण करीत निकाल जाहीर केला. रावेरच्या नगराध्यक्ष संगीत महाजन, केशव स्मृती चे पियुष रावळ, सचिन भिडे, प्रान्जली रस्से, डॉ पूजा महाजन, रावेरच्या नगरसेविका आदींच्या हस्ते विजयी संघाना रोख पारितोषिक, स्मृतिचिन्ह, शैक्षिणक साहित्यातील पॅड, सहभाग प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. याप्रसंगी भाजप जिल्हा उपाध्यक्ष रेखा बोन्डे, रावेर तालुका महिला मोर्चाच्या अध्यक्ष आशा कोळी, पूनम बोन्डे, नंदिनी पंत, सुरेखा अस्वल, शारदा चौधरी, अनिता तायडे, वंदना महाजन, शाईन शेख, मेघा भागवत, सुनीता डेरेकर यांच्यासह प्रेक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरिता खाचणे यांनी तर आभार दीपाली महाजन यांनी मानले.

कार्यक्रमाच्या यशस्विततेसाठी नगराध्यक्षा संगीता महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसेविका योगिता महाजन, अर्चना पाटील, सीमा जमादार, प्रमिला पाटील, जयश्री महाजन, सपना महाजन, भाग्यश्री इंगळे, अनिता तायडे, शाहीन शेख, हर्षाली महाजन, शुभांगी महाजन, रेखा बोन्डे, गौरी जोशी, आसावरी जोशी यांच्यासह रावेर नगरपालिका व अंबिका व्यायाम शाळेचे अनमोल सहकार्य लाभले. सहभागी संघाना भुलाबाईचा खाऊ वाटप करण्यात आला.

असा आहे निकाल

लहान गट
प्रथम – आदित्य इंग्लिश मिडीयम स्कुल, रावेर
द्वितीय – शांती विद्या मंदिर, फैजपूर
तृतीय – जिल्हा परिषद शाळा, पुनखेडा
उत्तेजनार्थ – सरदार जी जी हायस्कुल, रावेर

मोठा गट

प्रथम – उमरेश्वर माध्यमिक विद्यालय, दसनूर
द्वितीय – आदित्य इंग्लिश मिडीयम स्कुल, रावेर
तृतीय – शिवफुले आखाडा, रावेर
उत्तेजनार्थ – सुज्ञा अरुण महाजन शाळा, वढोदा

खुला गट

प्रथम – राजपूत महिला मंडळ, कोचुर
द्वितीय – आदित्य इंग्लिश मिडीयम स्कुल, रावेर
तृतीय – सुंदरकांड महिला मंडळ
उत्तेजनार्थ – नेवे समाज मंडळ, भुसावळ

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button