जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव शहरात किसना डायमंड अँड गोल्ड ज्वेलरीच्या ११व्या विशेष शोरूमचे भव्य उद्घाटन आज दि २० सप्टेंबर रोजी करण्यात आले. जेडीसीसी बँकेसमोर, दीनानाथ वाडी, रिंग रोड येथे सुरू झालेल्या या शोरूमचे उद्घाटन राज्यसभा खासदार व विशेष सरकारी वकील अॅड. उज्ज्वल निकम आणि हरी कृष्ण ग्रुपचे संस्थापक व व्यवस्थापकीय संचालक घनश्याम ढोलकिया यांच्या हस्ते झाले.

या उद्घाटन सोहळ्यास जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, रोहिणी खडसे, अनिल जैन यांच्यासह अनेक प्रमुखांची उपस्थिती होती.

किसना डायमंड अँड गोल्ड ज्वेलरीच्या किरकोळ विक्री विस्तारातील हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. जळगावमधील ग्राहकांसाठी उद्घाटनानिमित्त विशेष ऑफर्स जाहीर करण्यात आल्या आहेत. डायमंड ज्वेलरीच्या घडणावळ शुल्कावर थेट ३५ टक्के, तर गोल्ड ज्वेलरीच्या घडणावळ शुल्कावर २० टक्के सूट देण्यात येत आहे. याशिवाय ग्राहकांना जुने सोने देऊन डायमंड ज्वेलरीच्या खरेदीवर १०५ टक्के मूल्य मिळवण्याची संधीही देण्यात आली आहे.
हरी कृष्ण ग्रुपचे संस्थापक व व्यवस्थापकीय संचालक घनश्याम ढोलकिया म्हणाले की, सण-उत्सवांच्या काळात दागिने हा आनंदाचा अविभाज्य भाग असतो. जळगावमधील या शोरूमच्या माध्यमातून किसनाचे डायमंड आणि गोल्ड ज्वेलरीचे जग स्थानिक ग्राहकांच्या अधिक जवळ आणण्याचा प्रयत्न आहे. ‘हर घर किसना’ हे ध्येय अधिक बळकट करत प्रत्येक भारतीय कुटुंबापर्यंत डायमंड ज्वेलरी पोहोचवण्याचा कंपनीचा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.
किसना डायमंड अँड गोल्ड ज्वेलरीचे सीईओ पराग शहा यांनी सांगितले की, महाराष्ट्रातील कंपनीची उपस्थिती अधिक दृढ करण्यासाठी जळगाव हे महत्त्वाचे शहर आहे. स्थानिक ग्राहकांच्या पसंती आणि सणासुदीच्या परंपरांना साजेसे डायमंड व गोल्ड ज्वेलरीचे विविध डिझाइन्स, आकर्षक ऑफर्स आणि उत्कृष्ट शोरूम अनुभव देण्यावर भर राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
किसनाचे एक्सक्लुझिव्ह बँड आउटलेट भागीदार योगेश अशोक चौधरी, वैभव प्रवीण चौधरी आणि अंकुश राजेंद्र चौधरी यांनीही जळगावच्या दागिन्यांच्या समृद्ध संस्कृतीचा उल्लेख केला. पारंपरिकता आणि आधुनिक शैलीचा सुरेख संगम असलेल्या डिझाइन्सना येथील ग्राहकांची पसंती असल्याचे त्यांनी सांगितले. या सणासुदीच्या काळात नवीन शोरूमच्या माध्यमातून ग्राहकांचे स्वागत करण्यास उत्सुक असल्याचे त्यांनी नमूद केले.
जळगाव शहरात डायमंड आणि गोल्ड ज्वेलरीच्या विस्तृत कलेक्शनसह सुरू झालेले हे शोरूम ग्राहकांसाठी खरेदीचा नवा अनुभव घेऊन येणार असून, उद्घाटनानिमित्त जाहीर केलेल्या विशेष ऑफर्सकडे ग्राहकांचे लक्ष लागले आहे.










