सलग तिसऱ्या दिवशी सोने दरात मोठी घसरण, आता १० ग्रॅमचा दर काय?

ऑगस्ट 29, 2026 11:10 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना दिलासा देणारी बातमी आहे. आज सलग तिसऱ्या दिवशी सोने दरात मोठी घसरण झाली आहे. आज दिनांक २९ ऑगस्ट रोजी सराफा बाजार उघडताच २४ कॅरेट सोन्याचे दर २,८९० रुपयांनी घसरण झाल्याचे पाहायला मिळाले आहे. मात्र चांदीच्या किंमतीत कोणताही बदल पाहायला मिळालेला नाही.

gold silver 2 jpg webp

Goodreturns च्या माहितीनुसार, सण-उत्सवांचा काळ सुरू असताना सोन्याच्या दरात घसरण होत असल्याने ग्राहकांना खरेदीसाठी काहीसा दिलासा मिळाला आहे. आज २४ कॅरेट सोन्याच्या दरात २,८९० रुपयांची घट झाली आहे. याशिवाय २२ कॅरेट आणि १८ कॅरेट सोन्याच्या किमतीतही मोठी घसरण नोंदवण्यात आली आहे.

सोन्याचा दर किती?
आज २४ कॅरेट सोन्याचा दर १० ग्रॅमसाठी १,५८,२४९ रुपये इतका आहे. कालच्या तुलनेत त्यात २,८९० रुपयांची घट झाली आहे.
तर २२ कॅरेट सोन्याचा दर १० ग्रॅमसाठी १,४५,०५० रुपये झाला असून, त्यात २,६५० रुपयांची घसरण झाली आहे.
त्याचप्रमाणे १८ कॅरेट सोन्याचा दर १० ग्रॅमसाठी १,१८,६८० रुपये आहे. या दरातही आज २,१७० रुपयांची घट झाली आहे.

चांदीच्या दरात बदल नाही
सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली असली तरी चांदीच्या किमती मात्र आज स्थिर आहेत. त्यामुळे चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांना आज कोणताही दरबदल पाहायला मिळालेला नाही.

सणासुदीच्या काळात सोन्याच्या दरातील ही घसरण ग्राहकांसाठी महत्त्वाची मानली जात आहे. दरम्यान, सोन्या-चांदीच्या किमती बाजारातील विविध घडामोडींनुसार सतत बदलत असल्याने खरेदीपूर्वी स्थानिक सराफा बाजारातील ताजे दर तपासणे आवश्यक आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now