सोने-चांदीच्या दरवाढीला अखेर ब्रेक! जळगावात चांदी तब्बल ५ हजारांनी स्वस्त, सोनेही घसरले

ऑगस्ट 15, 2026 10:41 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । गेल्या दहा दिवसांपासून सातत्याने वाढत असलेल्या सोने-चांदीच्या दरांना अखेर ब्रेक लागला. मागच्या २४ तासात जळगावच्या सराफा बाजारात चांदीच्या दरात तब्बल ५ हजार रुपयांची घसरण झाली. यानंतर चांदीचा एक किलोचा दर २ लाख ३५ हजार रुपये प्रति किलोवर आला आहे.

gold silver 1 jpg webp

सोबतच तर सोन्याच्या दरात १०० रुपयांची घट होऊन सोने १ लाख ५२ हजार २०० रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचले.

दि. ३ ऑगस्टपासून सोने-चांदीच्या दरात सातत्याने वाढ होत होती. १२ ऑगस्टपर्यंत चांदीचा भाव वाढत जाऊन २ लाख ४० हजार रुपये प्रति किलोवर पोहोचला होता. मात्र, त्यानंतर बाजारात काहीशी नरमाई पाहायला मिळाली.

शुक्रवारी चांदीच्या दरात ५ हजार रुपयांची घसरण झाल्याने ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. सोन्याच्या दरातही १०० रुपयांची घट झाली आहे. त्यामुळे सणासुदीच्या पार्श्वभूमीवर सोने-चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांचे बाजारातील दरांकडे लक्ष लागले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now