जळगाव लाईव्ह न्यूज । सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात मोठ्या प्रमाणात चढ-उतार पाहायला मिळत असताना आज सकाळी बाजार उघडताच दोन्ही मौल्यवान धातूंच्या दरात मोठी वाढ झाली. सणासुदीचे दिवस जवळ येत असतानाच झालेल्या या तीव्र दरवाढीमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला मोठा फटका बसणार आहे.

सोन्याचा दर
Goodreturnsच्या माहितीनुसार, आज सकाळी बाजार उघडताच २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅम दरात ३,१६० रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे २४ कॅरेट सोन्याचा दर १ लाख ५५ हजार २८० रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे. तर २२ कॅरेट सोन्याचा दर २९०० रुपयांनी वाढून १ लाख ४२ हजार ३५० रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे. सोबतच १८ कॅरेट सोन्याचा दर २३७० रुपयांनी वाढून १ लाख १६ हजार ५०० रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे.

चांदीच्या दरातही मोठी तेजी
सोन्याबरोबरच चांदीच्या दरातही आज मोठी वाढ झाली आहे. चांदीचा दर प्रति किलो तब्बल १० हजार रुपयांनी वाढून २ लाख ५५ हजार रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे. त्यामुळे चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांनाही मोठा फटका बसणार आहे. चांदीच्या वाढत्या दरामुळे दागिने, चांदीच्या वस्तू आणि गुंतवणूक करणाऱ्या ग्राहकांच्या खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे.
सणासुदीपूर्वी दरवाढीचा झटका
आगामी सणासुदीच्या काळात सोने-चांदीची मागणी वाढण्याची शक्यता असतानाच दरात झालेल्या या मोठ्या वाढीमुळे ग्राहकांची चिंता वाढली आहे. सोन्याच्या दरात सातत्याने होत असलेल्या चढ-उतारामुळे बाजारातील परिस्थितीकडे ग्राहक आणि सराफ व्यावसायिकांचे लक्ष लागले आहे.












