उज्वल राष्ट्रासाठी युवा पिढीने राष्ट्रपुरुषांचे विचार आत्मसात करावेत ; आमदार राजूमामा भोळे

जुलै 23, 2026 3:00 PM

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना राष्ट्रपुरुषांची पुस्तके, वह्या व खाऊचे वाटप

जळगाव लाईव्ह न्यूज । मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भाजप जिल्हा कामगार आघाडीच्या वतीने रेमंड कॉलनी येथील महानगरपालिका शाळा क्रमांक ४५ मध्ये विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रपुरुषांची पुस्तके, वह्या आणि खाऊ वाटपाचा उपक्रम आयोजित करण्यात आला. या उपक्रमात सुमारे ६० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले.

RBM

या कार्यक्रमाला जळगाव शहराचे आमदार सुरेश भोळे (राजूमामा), भाजप महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी आणि भाजप कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रशांत जाधव प्रमुख उपस्थित होते. त्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना राष्ट्रपुरुषांची पुस्तके, वह्या आणि खाऊचे वाटप करण्यात आले.

यावेळी आमदार सुरेश भोळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “उज्वल राष्ट्र घडविण्यासाठी आणि महाराष्ट्राला प्रगतिशील बनविण्यासाठी युवा पिढीने राष्ट्रपुरुषांचे विचार आत्मसात करणे आवश्यक आहे. वाचन संस्कृतीमुळे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो आणि सुजाण नागरिक घडण्यास मदत होते.”

कार्यक्रमाला माजी उपमहापौर सुनील खडके, नगरसेविका वंदना इंगळे, नगरसेविका रंजना वानखेडे, संयोजक पितांबर भावसार, प्रदेश कार्यकारिणी सदस्य संतोष इंगळे, जिल्हा पदाधिकारी विजय वानखेडे, मनोज भांडारकर, माजी मंडल अध्यक्ष सुनील सरोदे, तसेच भाजप कामगार आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी हर्षल इंगळे, सुदर्शन चालसे, मनोज निंबाळकर, भारत पाटील, ज्ञानेश्वर पाटील, दिलीप चौधरी यांच्यासह महानगरपालिका शाळेच्या मुख्याध्यापिका अश्विनी अंबाड, उपशिक्षिका सविता पालवे आणि ज्योती काकडे यांनीही कार्यक्रमात सहभाग घेतला.

कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्याबरोबरच राष्ट्रपुरुषांच्या विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचा संदेश देण्यात आला.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now