पदवी पाससाठी सरकारी नोकरीचा गोल्डन चान्स! तब्बल 7365 पदांसाठी मेगाभरती

जुलै 22, 2026 1:55 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । बँकिंग क्षेत्रात सरकारी नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी एक सुवर्णसंधी चालून आली आहे. इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन (IBPS) ने प्रोबेशनरी ऑफिसर (PO) आणि मॅनेजमेंट ट्रेनी (MT) पदांच्या भरतीसाठी अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. या अंतर्गत एकूण 7365 पदांची मेगाभरती केली जाणार आहे. IBPS PO Bharti 2026

job jpg webp

या परीक्षेची तयारी करणारे इच्छुक आणि पात्र उमेदवार ऑनलाईन अर्ज करू शकतात. लक्ष्यात असू द्या अर्ज करण्याची अंतिम तारीख २७ जुलै २०२६ असणार आहे. IBPS PO Recruitment 2026

वेतनश्रेणी:

PO/MT पदांसाठी निवड झालेल्या उमेदवारांना ₹४८,४८० ते ₹८५,९२० पर्यंत मासिक वेतन मिळेल.

वयोमर्यादा:

किमान वयोमर्यादा २० वर्षे आणि कमाल वयोमर्यादा ३० वर्षे आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयोमर्यादेत सवलत देखील उपलब्ध आहे. SC आणि ST प्रवर्गातील उमेदवारांना ५ वर्षांची, OBC प्रवर्गातील उमेदवारांना ३ वर्षांची आणि दिव्यांग उमेदवारांना १० वर्षांची वयोमर्यादेत सवलत मिळेल.

शैक्षणिक पात्रता:

अर्ज करण्यासाठी, उमेदवारांनी भारतातील मान्यताप्राप्त संस्थेतून पदवी प्राप्त केलेली असणे आवश्यक आहे.

जाहिरात (PDF)Click Here
Online अर्जApply Online

नोंदणी शुल्क:
नोंदणी शुल्क प्रवर्गानुसार खालीलप्रमाणे निश्चित केले आहे.
SC/ST/PWD: ₹१७५
सर्वसाधारण/OBC/EWS: ₹८५०

निवड प्रक्रिया तीन टप्प्यांत घेतली जाईल

उमेदवारांची निवड प्राथमिक परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखतीच्या आधारे केली जाईल. प्राथमिक परीक्षेत इंग्रजी, संख्यात्मक योग्यता आणि तर्कशास्त्र या विषयांमधून १०० गुणांसाठी १०० बहुपर्यायी प्रश्न असतील. या परीक्षेत निवड झालेल्या उमेदवारांना मुख्य परीक्षेसाठी बोलावले जाईल. मुख्य परीक्षेत २०० गुणांसाठी १७० प्रश्न असतील. मुख्य परीक्षेचा कालावधी १६० मिनिटांचा आहे. मुख्य परीक्षेत निवड झालेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now