सुवर्णनगरी जळगावात सोने-चांदी स्वस्त! गेल्या २४ तासात मोठी घसरण; पाहा आताचे ताजे दर

जून 9, 2026 11:41 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ जून २०२६ । गेल्या काही काळापासून सातत्याने नवनवे उच्चांक गाठणाऱ्या सराफा बाजारात सोन्यासह चांदी दरात मोठी घसरण पाहायला मिळत आहे. सुवर्णनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जळगाव सराफा बाजारात खरेदीदारांना मोठा दिलासा मिळाला. गेल्या २४ तासात जळगावात सोन्याचे दर १,५४५ रुपये प्रतितोळा (१० ग्रॅम) तर चांदीचे दर तब्बल ७,२१० रुपये प्रतिकिलोने घसरले. यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला आहे

gold silver 1

आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि अमेरिकन डॉलर मजबूत झाल्यामुळे सोने आणि चांदीच्या दरात ५ टक्क्यांपर्यंत घसरण झाली आहे. जळगाव सराफा बाजारासह देशभरात सोने आणि चांदीचे दर कमालीचे स्वस्त झाले आहेत. बाजारातील तज्ज्ञांच्या मते, जागतिक पातळीवरील घडामोडींमुळे ही घसरण पुढेही काही काळ सुरू राहण्याची शक्यता आहे.

जळगाव सराफा बाजारात गेल्या २४ तासात सोने १,५४५ रुपयांनी घसरून १,५५,०१५ रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचले आहे. दुसरीकडे चांदी दरात तब्बल ७,२१० रुपयांची घसरण होऊन ती २,५२,३५० रुपये प्रति किलोवर स्थिरावली. केवळ गेल्या २४ तासातच नव्हे, तर गेल्या संपूर्ण आठवडाभरात सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण नोंदवली गेली आहे. गेल्या आठवडाभरात जळगाव सराफ बाजारात सोने ४,८४१ रुपये प्रतितोळा तर चांदी २१,६३० रुपये प्रतिकिलोने स्वस्त झाली आहे.

‘या’ कारणामुळे बदलला ट्रेंड; महागाई वाढूनही सोने स्वस्त!
साधारणपणे जगात महागाई आणि राजकीय अनिश्चितता वाढल्यास सोन्याला सुरक्षित गुंतवणूक मानले जाते आणि त्यामुळे सोन्याच्या किमती वाढतात. सध्या पश्चिम आशियामध्ये (Middle East) युद्ध पुन्हा भडकले असून कच्चे तेल महाग झाल्यामुळे जगभरात महागाई वाढण्याची शक्यता गडद झाली आहे.असे असूनही या वेळी मात्र बाजाराचा ट्रेंड उलटा फिरला आहे. अमेरिकन डॉलर अत्यंत मजबूत झाल्यामुळे आणि अमेरिकेतील व्याजदरांच्या स्थितीमुळे जागतिक स्तरावर सोन्या-चांदीवर दबाव निर्माण झाला आहे. परिणामी,सोन्यासह चांदीच्या किमतीत घसरण होत आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now