जळगावात तरुण रिक्षाचालकाने संपविले जीवन; पत्नी मुलांसह माहेरी असताना उचलले टोकाचे पाऊल

मे 27, 2026 11:29 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । शहरातील वाघनगरात राहणाऱ्या ३५ वर्षीय रिक्षाचालकाने राहत्या घरात गळ#$फास घेऊन आपली जीवनयात्रा संपविल्याची घटना उघडकीस आली. अमीर हमीद तडवी असे मृत तरुणाचे नाव असून मुलांच्या शाळांना सुट्या असल्याने पत्नी मुलांना घेऊन माहेरी गेलेली असताना घरात कुणीही नसताना अमीरने हे टोकाचे पाऊल उचलले. त्यांच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणी जळगाव तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

ameer tadvi

अमीर तडवी हे गेल्या काही महिन्यांपासून म्युन्सिपल कॉलनीतून वाघनगरात आपल्या कुटुंबासह राहण्यास आले होते मुलांच्या शाळांना सुट्या असल्यामुळे त्यांची पत्नी गेल्या ५-६ दिवसांपासून जळगाव शहरातच असलेल्या आपल्या माहेरी गेली होती.अमीर हा रोज सकाळी नेहमीप्रमाणे रिक्षा चालवण्यासाठी बाहेर पडायचा. मात्र, मंगळवारी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास तो घराबाहेर पडला नाही. त्यामुळे शेजाऱ्यांना शंका आली. त्यांनी घरात पाहिले असता अमीर गळ#$ फास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला.

घटनेची माहिती मिळताच त्याच्या रिक्षाचालक मित्रांनी तातडीने त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (जीएमसी) दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकारी डॉ. अमोल पाटील यांनी तपासणी अंती त्याला मृत घोषित केले.

या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच तडवी कुटुंबाला प्रचंड धक्का बसला. अमीरच्या नातेवाईकांनी रुग्णालयात एकच आक्रोश केला होता. त्याच्या पश्चात आई, वडील, मोठा भाऊ, पत्नी, मुलगी परी (वय ८ वर्ष) आणि मुलगा आर्यन (वय ५ वर्ष) असा परिवार आहे. घरातील कमावता पुरुष गेल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या प्रकरणी जळगाव तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आत्महत्येमागचे कारण शोधण्यासाठी पोलिस उपनिरीक्षक मोरे पुढील तपास करीत आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now