ऑनलाइन औषध विक्री विरोधात जळगावात केमिस्टचा एल्गार; जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा

मे 20, 2026 6:43 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २० मे २०२६ । ऑनलाईन औषध विक्रीच्या विरोधात जळगाव जिल्हा मेडिकल डीलर्स असोसिएशन तर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर एक भव्य आणि लक्षवेधी मोर्चा काढण्यात आला होता. या आंदोलनादरम्यान केमिस्टांनी ऑनलाइन औषध विक्रीची चक्क ‘तिरडी’ काढून ई-कॉमर्स कंपन्यांचा तीव्र निषेध केला. या अनोख्या आंदोलनाची सध्या संपूर्ण जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरू आहे. यावेळी मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा असोसिएशन तर्फे देण्यात आला आहे.

chemist

कोरोना काळात सरकारने औषधांच्या होम डिलिव्हरीसाठी दिलेली तात्पुरती परवानगी संपल्यानंतरही, ई-कॉमर्स कंपन्यांकडून बेकायदेशीरपणे ऑनलाईन औषध विक्री सुरू असल्याचा आरोप केमिस्ट संघटनेने केला आहे. या ऑनलाईन विक्रीमुळे डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनची योग्य पडताळणी होत नसल्याचे समोर आले आहे.

धक्कादायक बाब म्हणजे, एआय म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने बनावट प्रिस्क्रिप्शन तयार करून औषधे मागवली जात आहेत. यामुळे प्रतिजैविके आणि अंमली पदार्थांचा गैरवापर वाढण्याचा मोठा धोका निर्माण झाला असून, तरुण पिढी व्यसनाधीनतेकडे झुकण्याची भीती व्यक्त होत आहे. याच गंभीर मुद्द्याकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आणि ऑनलाईन औषध विक्रीवर कायमस्वरूपी बंदी घालण्याच्या मागणीसाठी जळगावात हा भव्य मोर्चा काढण्यात आला होता. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही असोसिएशनने दिला आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now