जळगाव लाईव्ह न्यूज । भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक मोर्चा जळगाव महानगराची महत्त्वपूर्ण बैठक २२ एप्रिल रोजी उत्साहात पार पडली. जळगाव महानगर अध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली आणि अल्पसंख्याक मोर्चाचे नवनिर्वाचित जिल्हा महानगर अध्यक्ष परवेज खान पठाण यांच्या अध्यक्षतेखाली या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमात नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा आणि मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर नगरसेवक जाकीर पठाण, सुरेश सोनवणे, अतुल बारी, तसेच पत्रकार व जिल्हा महानगर उपाध्यक्ष वसीम खान उपस्थित होते. यासह माजी अध्यक्ष अश्फाक खाटिक, अफसर शेख, वसीम शेख, शैलेंद्र परदेशी, वाहतूक आघाडीचे शहर अध्यक्ष जब्बार खान, दीपक परदेशी, मंडळ अध्यक्ष इरफान शेख, लियाकत खान, इद्रिस भाई या मान्यवरांनी आपले मौल्यवान मनोगत व्यक्त केले.

बैठकीत आगामी काळातील पक्षाची ध्येयधोरणे आणि अल्पसंख्याक समाजातील शेवटच्या घटकापर्यंत शासनाच्या योजना कशा पोहोचवता येतील, यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. नवनियुक्त अध्यक्ष परवेज खान पठाण यांनी संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्याचा संकल्प व्यक्त केला.
कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती
या बैठकीला आसिफ सलीम तडवी, हसन शेख, आमिर सय्यद, कलीम पटेल, रवींद्र दास, दानिश शेख, शाकीर खान, हाशिम बागवान, रेहान रजा, आबिद खान, सलमान खान, निजाम खान, असलम खान, मोहसीन शाह, प्रकाश भंगाळे, तहसील पिंजारी, अरबाज खान, शोएब शेख, शाहिद खान, अजीम शेख, हुसेन भाई यांच्यासह मोठ्या संख्येने भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.












