डॉ. उल्हास पाटील भुसावळ सीबीएसई स्कूलचा निकाल १०० टक्के

एप्रिल 16, 2026 1:56 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । भुसावळ येथील डॉ. उल्हास पाटील सीबीएसई इंग्लिश मिडीअम स्कूलचा इयत्ता दहावीचा निकाला यंदाही १०० टक्के लागला आहे. दहावीच्या शालांत परीक्षेसाठी सर्व २११ विद्यार्थ्यांनी नेत्रदिपक यश मिळविले आहे. यात ऋतुजा रमाकांत बर्‍हाटे हीने ९८.४० टक्के गुण प्राप्त करून शाळेतून प्रथम क्रमांक पटकाविला आहे.

New Project 5 1

डॉ. उल्हास पाटील सीबीएसई इंग्लिश मिडीअम स्कूलच्या निकालात केशिका पवन चौधरी हिने ९८ टक्के गुण प्राप्त करीत द्वितीय, तर हर्षमान जोनवाल याने ९७.८० टक्के गुण प्राप्त करून तृतीय क्रमांक पटकविला आहे. तर आरूष गुप्ता याने ९५.८० टक्के, रिध्दी आमोदकर ९५.४०, आर्या अतुल अयाचित ९५, आदर्श कुशवाहा ९५, इशान बागलकोटी ९४.६०, हंसराज झांबरे ९४.४०, आर्यन गुप्ता ९४.२०, सुहाना मेहता ९४, पार्थ बोरोले ९३.८०, हर्ष राज ९३.६०, देविका घुगे ९३.४०, सोहम खडसे ९३, गुंजन भिरूड ९२.४०, समीक्षा दांडगे ९२.२०. रिया राणी ९१.८०, वरूण पाटील ९१.२०, दिव्या पालवे ९१ टक्के असे गुण प्राप्त करीत घवघवीत यश मिळविले आहे.

या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, संचालिका डॉ.वर्षा पाटील सचिव डॉ. केतकी पाटील, हृदयरोगतज्ञ डॉ.वैभव पाटील, प्राचार्या अनघा पाटील यांनी कौतुक केले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now