भूतदयेचा सुंदर संदेश : रमेशकुमार मुनोत यांचा मोफत जलकुंड-परळ वाटप उपक्रम सुरूच!

एप्रिल 10, 2026 4:51 PM

रविवारी पुन्हा वितरण : जनजागृतीसाठी व्हॉट्सअॅप ग्रुपची निर्मिती

जळगाव लाईव्ह न्यूज । सध्या उन्हाळ्याची तीव्रता वाढली असून तापमान ४० अंश सेल्सिअसच्या पुढे गेले आहे. या कडक उन्हामुळे मोकाट जनावरे, पशू आणि पक्ष्यांना पाण्याअभावी मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील सामाजिक कार्यकर्ते तथा व्यावसायिक रमेशकुमार मुनोत यांनी भूतदयेच्या भावनेतून जलकुंड आणि परळ मोफत वाटपाचा उपक्रम हाती घेतला आहे.

Ramesh Kumar

या उपक्रमांतर्गत शहरात एकूण १५० जलकुंड आणि ५० परळ वितरित करण्यात आले आहेत. नागरिकांनी हे जलकुंड सावलीच्या ठिकाणी ठेवून जनावरांना पाण्याची सोय करून द्यावी, असे आवाहन मुनोत यांनी केले आहे. विशेष म्हणजे, ज्यांच्याकडे सावलीची जागा उपलब्ध नाही त्यांच्यासाठी बॅनरची सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

समाजसेवेचा हा उपक्रम अजूनही सुरूच आहे. एप्रिल आणि मे महिन्यातील उन्हाची तीव्रता लक्षात घेता जलकुंड आणखी तयार करण्यात आले असून त्याचे वाटप रविवारी सकाळी ९.३० ते १०.३० दरम्यान ओम् साई रिअल इस्टेट कन्सल्टन्स, शाहू नगर, याठिकाणी वाटप केले जाणार आहे.

सामाजिक उपक्रम अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावा यासाठी, इच्छुक नागरिकांनी जलकुंड किंवा परळ मिळवण्यासाठी 9823027461 या क्रमांकावर संपर्क साधून अगोदर नोंदणी करावी, असे आवाहनही रमेशकुमार मुनोत यांनी केले आहे.

आजवर ज्या नागरिकांनी जलकुंड किंवा परळ घेतलेले आहेत अशा प्राणीप्रेमींसाठी एक व्हॉट्सअप ग्रुप तयार करण्यात आला आहे. परळ आणि जलकुंड यांचा उपयोग योग्य प्रकारे होण्यासाठी आणि प्राण्यांना फायदा होऊन इतरांना प्रेरणा देण्यासाठी फोटो प्रसिद्ध करावे यासाठी ग्रुप तयार करण्यात आला आहे. अधिकाअधिक नागरिकांनी ग्रुपमध्ये जुळावे आणि फोटो पाठवावे असे आवाहन रमेशकुमार मुनोत यांनी केले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now