जळगावच्या महादेव हॉस्पिटलमध्ये उष्माघातग्रस्त रुग्णांसाठी विशेष कक्ष राखीव..!

मार्च 12, 2026 3:22 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । वाढत्या तापमानामुळे खान्देशात उष्माघाताचा धोका निर्माण झाला असून, नागरिकांनी स्वतःची काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य तज्ञांकडून करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर जळगाव येथील प्रसिद्ध महादेव हॉस्पिटलमध्ये उष्माघातग्रस्त रुग्णांसाठी विशेष सुविधा आणि तज्ज्ञ डॉक्टरांची टीम २४ तास उपलब्ध करून देण्यात आली आहे.

heatstroke patients

उन्हाळ्यात वाढत्या तापमानामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊन जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. लक्षणे दिसल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. यात प्रचंड डोकेदुखी होणे, चक्कर येणे किंवा शरीरात कमालीचा अशक्तपणा जाणवणे, उलट्या होणे किंवा मळमळणे, शरीर अतिउष्ण होणे (ताप येणे), शुद्ध हरपणे किंवा बेशुद्ध पडणे ही लक्षणे दिसू शकतात.

वेळेवर उपचार न मिळाल्यास उष्माघात जीवघेणा ठरू शकतो. ही बाब लक्षात घेऊन महादेव हॉस्पिटल, आकाशवाणी चौक, जळगाव येथे रुग्णांच्या तत्काळ तपासणीसाठी तज्ज्ञ डॉक्टरांची विशेष टीम तैनात करण्यात आली आहे. रुग्णांना वेळेत उपचार मिळावेत यासाठी सर्व आधुनिक सोयी-सुविधा येथे सज्ज आहेत.

संपर्क व आपत्कालीन मदतकरिता उष्माघाताचा त्रास जाणवल्यास नागरिकांनी हेल्पलाईन: ९११ २०३ ००५५, ९११ २०४ ००५५, ९३२ ५१५ ०००४ संपर्क साधावा. वाढत्या उन्हात शक्यतो बाहेर जाणे टाळावे आणि भरपूर पाणी पिऊन स्वतःचे रक्षण करावे, असे आवाहन हॉस्पिटल प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now