जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार राजूमामा भोळे यांच्या उपस्थितीत आज ४ ‘ड’ मधील महायुतीचे (शिवसेना – शिंदे गट) उमेदवार पियुष ललित कोल्हे यांच्या प्रचारार्थ निघालेल्या रॅलीत जनसागर लोटला गेला होता. यावेळी ढोल-ताशांचा कडकडाट आणि “विजयी असो” च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता.

स्थानिक श्रीराम मंदिरात जाऊन प्रभू श्रीरामचंद्रांचे दर्शन घेतल्यानंतर रॅलीला प्रारंभ झाला. यावेळी आमदार राजूमामा भोळे यांनी मतदारांशी संवाद साधताना सांगितले की, “शहराच्या विकासासाठी आणि महायुतीचे हात बळकट करण्यासाठी पियुष कोल्हे यांच्यासारख्या तरुण आणि अभ्यासू नेतृत्वाला बहुमताने विजयी करा.”

रॅली दरम्यान ठिकठिकाणी पियुष कोल्हे यांचे स्वागत करण्यासाठी महिलांनी रस्त्यावर आकर्षक रांगोळ्या काढल्या होत्या. अनेक ठिकाणी त्यांच्यावर फुलांची उधळण करण्यात आली, तर भगिनींनी औक्षण करून त्यांना विजयाचा टिळा लावला.पियुष कोल्हे यांनी प्रत्येक गल्लीत जाऊन ज्येष्ठ नागरिकांचे आशीर्वाद घेतले आणि तरुणांच्या हाताला हात देऊन विकासाचे वचन दिले. महायुतीचे विविध स्तरांवरील नेते, पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्त्यांनी या रॅलीत सक्रिय सहभाग घेतला.










