बिहारमध्ये पुन्हा नितीश सरकारच? जेडीयूने बहुमताचा जादुई आकडा ओलांडला, कॉंग्रेसचा सुपडासाप..

नोव्हेंबर 14, 2025 11:15 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ नोव्हेंबर २०२५ । बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल आज शुक्रवारी जाहीर केला जात असून यासाठी सकाळी ८ वाजता मतमोजणी सुरू झाली. दरम्यान सुरुवातीच्या कलांनुसार एनडीएने मोठी आघाडी घेतली आहे. बिहारच्या निवडणुकीत नितीश कुमार हेच बाहुबली ठरताना दिसत आहेत. सुरुवातीचे जे कल येत आहेत. त्यात पुन्हा नितीश सरकारच सत्तेत येताना दिसत आहे.

bihar election

एनडीएला १८४ जागांवर, महाआघाडी ५१ जागांवर आणि इतर ८ जागांवर आघाडीवर आहेत. आतापर्यंच्या कलानुसार जेडीयू बिहारमधील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. सकाळी ११ वाजेच्या कलांनुसार जेडीयूला ८१ जागांवर आहे. तर भाजप ७८ जागांवर आघाडीवर आहे. सुरुवातीच्या कलांनुसार एनडीएला स्पष्ट बहुमत मिळत असल्याचे आकड्यावरून दिसत आहे. बिहार निवडणुकीमध्ये कॉंग्रेसला सर्वात मोठा झटका बसला आहे. काँग्रेस फक्त ६ जागांवर आघाडी घेतली

बिहारमध्ये २४३ मजागांसाठी दोन टप्प्यामध्ये मतदान झाले होते. आज मतमोजणी सुरू असून ४६ मतदान केंद्रांवर मतमोजणी सुरू आहे. सर्व मतदान केंद्राबाहेर मोठी गर्दी झाली आहे. सकाळी ११ वाजेपर्यंतच्या निकालानुसार एनडीएने बहुमताचा जादुई आकडा पार केला आहे. बहुमतासाठी १२२ जागांवर विजयी होणं गरजेचे आहे. सुरुवातीच्या कलांनुसार एनडीएला १८४ जागांवर आघाडी घेतली आहे. अब चौथी बार नितीश सरकार ही घोषणा खरी होताना दिसत आहे. नितीश कुमार यांच्यासाठी ही आनंदवार्ता आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now