तर भाजपही स्वबळावर लढेल ; आमदार किशोर पाटीलांच्या भूमिकेनंतर भाजप आमदाराचं प्रत्युत्तर

ऑक्टोबर 20, 2025 11:34 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २० ऑक्टोबर २०२५ । आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांपूर्वीच जळगाव जिल्ह्यात महायुतीमध्ये पहिला मोठाचा खडा पडला आहे. याच कारण म्हणजे पाचोरा-भडगावचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनी स्थानिक स्वराज्यच्या निवडणुका स्वबळावर लढण्याची भूमिका जाहीर केली.

MAL Kishor patil jpg webp

यानंतर आता चाळीसगावचे भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी आमदार किशोर पाटील यांच्या भूमिकेवर भाजपच्या नुकत्याच झालेल्या आढावा बैठकीत उत्तर दिलं. किशोर पाटील स्वबळाची भाषा करत असतील, तर भाजपही स्वबळावर लढेल असं मंगेश चव्हाण यांनी स्पष्ट केलं.

राजकारणात कोणीही कायमचा मित्र किंवा शत्रू नसतो त्यामुळे किशोर पाटलांनी टोकाचे बोलू नये. युतीबाबत जो काही निर्णय घ्यायचा तो मंत्री गुलाबराव पाटील व मंत्री गिरीश महाजन घेतील. किशोर पाटील यांचा काही गैरसमज झाला असेल. त्यांच्याशी चर्चेसाठी आमची दारे खुली आहेत. त्यांचा काही प्रस्ताव आल्यास त्यावर चर्चा करून निर्णय घेता येईल, असे आवाहन मंगेश चव्हाण यांनी केलं होतं.

परंतु यावरही मंगेश चव्हाण यांना पुन्हा आमदार किशोर पाटील यांनी माध्यमांशी बोलताना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. ‘मंगेशदादा तुमची दारे चर्चेसाठी उघडी असतील, पण आमची मात्र बंद आहेत’ असं स्पष्टपणे सांगितलं. अमोल शिंदे यांना दोन्ही विधानसभा निवडणुकीवेळी भाजपने दिलेली उमेदवारी, पुरविलेली रसद व युती धर्माशी केलेली गद्दारी यासंदर्भात बोला, असं किशोर पाटील म्हणाले.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now