प्रारूप यादीवर हरकत घेण्यासाठी मुदतवाढ द्या : प्रा. धिरज पाटील

ऑक्टोबर 14, 2025 10:15 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । आगामी भुसावळ नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणूक २०२५ साठी निवडणूक विभागामार्फत प्रभागानुसार प्रसिद्ध करण्यात आलेल्या मतदारयादी मध्ये असंख्य दुरूस्त्या आहेत. शहरातील २५ पैकी दहा प्रभागांमध्ये लोकसंख्येपेक्षा मतदारांची संख्या अधिक आहे. यासोबतच आजूबाजूच्या प्रभागातील मतदार संख्याही वाढीव मतदार असलेल्या प्रभागांमध्ये समाविष्ठ झाली आहे. यामुळे मतदार यादीत मोठ्या प्रमाणात गोंधळाच्या तक्रारी आहेत. तसेच अनेक प्रभागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात मतदारांच्या नावात तफावत असून त्याला हरकत घेण्याचा कालावधी १५ ऑक्टोबर पर्यंत मुदतवाढ देण्यात यावी, हरकतींची संख्या लक्षात घेता २८ ऑक्टोबर पर्यंत तक्रारींचा निपटारा करता येणे अशक्य आहे, यातही दिवस वाढवून द्यावे,अशी मागणी भाजपा कार्यकर्ते प्रा. धिरज पाटील यांनी राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांच्याकडे केली आहे.

matadan yadi

या निवेदनात पालिकेच्या इतिहासात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात हरकती दाखल झाल्याने प्रशासनाची दमछाक झालेली दिसतेय. दुसऱ्याच प्रभागात यादीमध्ये नाव समाविष्ट झाल्याने मतदारांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले असून त्यांना निवडणुकीच्या मतदानावेळी आपले नाव प्रभाग यादी मध्ये न सापडल्यास सदरचे मतदार हे मतदानापासून वंचित राहतील. याचा विचार करता प्रारूप मतदार यादीमध्ये झालेल्या चुका दुरुस्त करून नवीन दुरुस्त मतदार यादी प्रसिद्ध करण्यात यावी असे नमूद करण्यात आले आहे.

प्रभागानुसार फोडण्यात आलेल्या मतदार याद्या परिपूर्ण प्रभाग रचनेला अनुसरून विभागणी केलेली नसल्याने सर्व प्रभागांमधील हजारो नावे मूळ प्रभागांमध्ये न राहता दुसऱ्या प्रभागांमध्ये चुकीच्या पद्धतीने जोडली आहेत. प्रारूप मतदार यादीतील मतदारांची नावे शोधण्यासाठी संभाव्य उमेदवारांना व मतदारांना हरकतीसाठीचा अवधी खूपच कमी पडत आहे. निवडणूक प्रक्रिया पारदर्शक होण्यासाठी प्रारूप मतदार यादीवर हरकत घेण्यासाठी काही दिवसांची मुदतवाढ मिळणे अत्यंत आवश्यक आहे

  • प्रा. धिरज पाटील, भाजपा कार्यकर्ते

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now