जळगाव लाईव्ह न्यूज । १३ ऑक्टोबर २०२५ । जळगाव एमआयडीसीसाठी चिंचोली परिसरातील तब्बल २६८ हेक्टर शेती जमिनींचे संपादन करण्यात येणार आहे. मात्र याच भूसंपादनास विरोध करत चिंचोली परिसरातील शेतकऱ्यांनी आज औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) अधिकाऱ्यांचा रस्ता अडवून जोरदार निदर्शने करत ठिय्या आंदोलन केले आहे.

यावेळी आमची शेती आमचं आयुष्य आहे, जमिनीशिवाय आम्ही जगायचं कसं? अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. यावेळी जमिनी मोजण्यासाठी आलेल्या महसूल आणि एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांचा शेतकऱ्यांनी घेराव घालत कामाला विरोध केला. दरम्यान, प्रशासनाकडून जमिनीचे मोजमाप करण्याचा प्रयत्न झाला असला तरी शेतकऱ्यांच्या विरोधामुळे ते काम थांबवण्यात आले आहे.

एमआयडीसीसाठी होणाऱ्या जमीन संपादनाला विरोध दर्शवित शेतकऱ्यांनी जळगाव-औरंगाबाद महामार्गावर ठिय्या मांडून प्रशासनाविरोधात तीव्र घोषणाबाजी केली. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी महामार्गावर ठिय्या मांडत प्रशासनाविरोधात संतप्त घोषणाबाजी केली. यामुळे परिस्थिती ताणतणावपूर्ण बनल्याने पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत शेतकऱ्यांची समजूत काढली. यानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले आहे.












