मालवाहूच्या धडकेत दुचाकीस्वार तरुण ठार

जून 16, 2021 12:05 AM

मालवाहूच्या धडकेत दुचाकीस्वार तरुण ठार

img 20210615 wa0115

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ जून २०२१ । शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर भरधाव मालवाहूने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार तरुण जागीच ठार झाल्याची घटना मंगळवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास घडली.

कासमवाडी परिसरात राहणारा येथे संदीप उत्तम चौधरी वय-२९ हा तरुण आज मंगळवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास दुचाकी क्रमांक एमएच.१९.डीएल.३७०७ ने घरी जात असताना भरधाव वेगाने येणाऱ्या मालवाहू पिकअप व्हॅन क्रमांक एमएच.१९.एस.९५११ ने त्याला जोरदार धडक दिली. या धडकेत संदीप चौधरी हा तरुण जागीच ठार झाला आहे.

घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे कर्मचारी सुधीर साळवे, साईनाथ मुंडे व होमगार्ड ईश्वर पवार यांनी घटनास्थळी धाव घेतली.

चेतन वाणी

पत्रकारिता क्षेत्रात गत ११ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now