अ. भा. मराठी पत्रकार परिषदेवर डॉ. गोपी सोरडे यांची निवड

जून 15, 2021 8:50 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ जून २०२१ । अ.भा. मराठी पत्रकार परिषदेच्या उपक्रमांना , आंदोलनाला व्यापक प्रसिद्धी मिळावी  म्हणून प्रत्येक जिल्ह्यात प्रसिद्धी प्रमुख नेमण्यात आली. यात जळगाव जिल्ह्यासाठी देशदूतचे डॉ. गोपी सोरडे तर धुळे-नंदुबार जिल्ह्यासाठी ज्येष्ठ पत्रकार गो.पी. लांडगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

gopi sorade

परिषदेचे उपाध्यक्ष यशवंत पवार आणि नाशिक विभागीय सचिव मन्सुरभाई यांनी केलेल्या शिफारशीनुसार परिषदेचे कार्याध्यक्ष शरद पाबळे आणि सरचिटणीस संजीव जोशी यांनी नाशिक विभागातील जिल्हा प्रसिद्धी प्रमुखांची यादी आज जाहीर केली.

तसेच नाशिक जिल्ह्यासाठी पत्रकार प्रमोद दंडगव्हाळ,  जळगाव जिल्ह्यासाठी डॉ. गोपी सोरडे, अहमदनगर जिल्ह्यासाठी अमोल वैद्य (अकोले) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती एक वर्षासाठी असेल. नवनियुक्त जिल्हा प्रसिद्धी प्रमुखांचे मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख, विश्वस्त किरण नाईक, अध्यक्ष गजानन नाईक,  राज्य प्रसिद्धी प्रमुख अनिल महाजन यांनी कौतूक केले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now