खान्देशात राजकीय भूकंप ; माजी मंत्री अजित पवार गटाच्या वाटेवर

ऑगस्ट 13, 2025 10:37 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ ऑगस्ट २०२५ । राजकारणात कधी काय होईल हे सांगणं कठीण आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वीच राज्यातील सर्वच राजकीय पक्षांमध्ये इनकमिंक आणि आऊटगोईंग सुरू आहे. याच दरम्यान खान्देशातील नंदूरबार जिल्ह्यात राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे.

ajit pawar ncp jpg webp

तो म्हणजे माजी मंत्री ॲड पद्माकर वळवी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वाटेवर आहेत. पद्माकर वळवी हे आधी काँग्रेसमध्ये आणि नंतर भाजपमध्ये होते. त्यामुळे नंदुरबार जिल्ह्यात काँग्रेस आणि भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष अभिजीत मोरे आणि माजी मंत्री पद्माकर वळवी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या भेटीने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. लवकरच ते राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. आदिवासी आक्रमक चेहरा म्हणून पद्माकर वळवी यांची ओळख आहे. त्यांनी जर अजित पवार गटात प्रवेश केला तर हा जिल्ह्यात राष्ट्रवादीची ताकद वाढेल. यामुळे भाजप आणि काँग्रेसला मोठा धक्का बसेल.

काँग्रेस सरकारमध्ये तत्काली क्रीडा मंत्री असलेल्या पद्माकर वळवी यांनी लोकसभेपूर्वी काँग्रेसचा हात सोडून भाजपात प्रवेश केला होता. मात्र उमेदवारी न मिळाल्याने विधानसभेत त्यांनी भाजपला रामराम करत आदिवासी पार्टीत प्रवेश करत विधानसभा निवडणूक लढवली होती. मात्र या निवडणुकीमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागता होता. त्यानंतर आता ते राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now