जळगाव लाईव्ह न्यूज । १ जुलै २०२५ । एक लाख रुपयाचा टप्पा गाठल्यानंतर मागच्या काही दिवसापासून सोन्याच्या दरात घसरण दिसून आली. यामुळे खरेदीदारांना दिलासा मिळाला. मात्र आज महिन्याच्या पहिल्या दिवशी, मंगळवार, १ जुलै रोजी, सोन्याच्या भावात मोठी वाढ झाली. सोन्याचे दर आज प्रति तोळा १,१४० रुपयांनी वाढले आहेत. भाव वाढल्याने ग्राहकांना मात्र ,सोने खरेदी करावेत की नाही असा प्रश्न पडला आहे.

२४ कॅरेट सोन्याचा दर
आज २४ कॅरेट सोन्याच्या दरात ११४० रुपयांनी वाढ झाली आहे. आज सोन्याचे दर ९८,४०० रुपये आहेत. ८ ग्रॅम सोनं ७८,७२० रुपयांवर विकले जात आहे. तर १० तोळा सोन्याचे दर ११,४०० रुपयांनी वाढले आहेत. १० तोळ्याचे दर ९,८४,००० रुपये आहे.

२२ कॅरेट सोन्याचा दर
आज २२ कॅरेट सोन्याच्याही दरात वाढ झाली आहे. १०५० रुपये प्रति तोळा वाढ झाली आहे. हे दर ९०,२०० रुपये झाले आहेत. ८ ग्रॅम सोन्याचे दर ७२,१६० रुपये आहेत. १० तोळा सोन्याचे दर ९,०२,००० रुपये आहे. याचे दर ९,०२,००० रुपये आहेत. आज १८ कॅरेट सोन्याच्या दरात ८६० रुपयांनी वाढ झाली आहे. १० ग्रॅम सोन्याची किंमत ७३,८०० रुपये आहे. ८ ग्रॅम सोन्याचे दर ५९,०४० रुपये आहे.
चांदीचे दर वाढले
आज चांदीच्या दरातदेखील वाढ झाली आहे. आज १० ग्रॅम चांदीचे दर ११०० रुपये आहेत. १०० ग्रॅम चांदीचे दर ११,००० रुपये आहेत. या दरात २३०० रुपयांनी वाढ झाली आहे. सोन्यासोबत चांदीचेही दर वाढले आहेत.












