SBI : स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये पदवीधरांना नोकरीची संधी; 541 जागांसाठी भरती, पगार 85920

जून 28, 2025 11:03 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । बँकेत सरकारी नोकरीचा विचार करणाऱ्या तरुणांसाठी एक मोठी बातमी आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने प्रोबेशनरी ऑफिसर भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. विशेष पदवीधर उमेदवारांना बँकेत नोकरीची ही सुवर्णसंधी असणार आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. या भरतीद्वारे एकूण 541 जागा भरल्या रिक्त आहेत.

sbi

या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र असलेल्या उमेदवारांनी अजिबात वेळ वाया न घालवता अर्ज करावा. स्टेट बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन तुम्ही अर्ज करु शकतात. तुम्ही sbi.co.in या वेबसाइटवर जाऊन सर्वात आधी अधिसूचना वाचा आणि त्यानंतर डायरेक्ट लिंकवर जाऊन फॉर्म भरा. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १४ जुलै आहे.

भरतीसाठी आवश्यक पात्रता?
अर्ज करणाऱ्या उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा संस्थेतून ग्रॅज्युएशन पूर्ण केलेले असावे.
वयोमर्यादा :
२१ वर्षे ते ३० वर्षे. वय १ एप्रिल २०२५ पासून मोजले जाईल. म्हणजेच उमेदवाराचा जन्म २ एप्रिल १९९५ पूर्वी आणि १ एप्रिल २००४ नंतर झालेला नसावा. एससी आणि एसटींना वयोमर्यादेत ५ वर्षे सूट मिळेल आणि ओबीसींना तीन वर्षे सूट मिळेल.
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/EWS: ₹750/- [SC/ST/PWD: फी नाही]
पगार : 48480-2000/7-62480-2340/2-67160-2680/7-85920/-

अर्ज प्रक्रिया
एसबीआय पीओ भरती २०२५ अर्ज भरण्यासाठी, प्रथम ibpsonline.ibps.in/sbipomay25/ या पोर्टलला भेट द्या.
यानंतर नवीन नोंदणीसाठी येथे क्लिक करा आणि आवश्यक तपशील भरून नोंदणी करा.
आता इतर तपशील भरून अर्ज भरा.
स्वाक्षरी आणि छायाचित्र अपलोड करा.
शेवटी विहित शुल्क (लागू असल्यास) भरून फॉर्म सबमिट करा आणि त्याची प्रिंटआउट घ्या आणि ती तुमच्याकडे सुरक्षित ठेवा.
अर्ज प्रिंट करण्याची शेवटची तारीख २९ जुलै २०२५ आहे.

जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now