शेतात काम करताना विजेचा फटका बसून तिघांचा मृत्यू ; चाळीसगाव तालुक्यातील घटना

जून 15, 2025 6:52 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ जून २०२५ । जळगाव जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस होत आहे. याच दरम्यान चाळीसगाव तालुक्यातील मौजे कोंगानगर येथे आज दुपारी शेतात काम करत असताना विजेचा अचानक फटका बसून तिघांचा मृत्यू झाला. तर एक जण जखमी झाला असून चाळीसगाव येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

vij

लखन दिलीप पवार (वय 14 वर्षे, रा. कोंगानगर), दशरथ उदल पवार (वय 24 वर्षे, रा. कोंगानगर), समाधान प्रकाश राठोड (वय 9 वर्षे, रा. जेहूर, ता. कन्नड, जि. औरंगाबाद) असं मयतांचे नाव असून दिलीप उदल पवार (वय 35 वर्षे) हे जखमी झाले.

या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच उपविभागीय अधिकारी चाळीसगाव, तहसीलदार चाळीसगाव, नायब तहसीलदार महसूल, मंडळ अधिकारी व तलाठी यांनी शासकीय रुग्णालयात भेट देऊन मृतांच्या नातेवाईकांना धीर दिला. पुढील मदत कार्यासाठी महसूल प्रशासनाकडून आवश्यक कार्यवाही सुरू करण्यात आली असल्याची माहिती तहसीलदार प्रशांत पाटील यांनी दिली.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment