जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । जर तुम्हाला देशाच्या सागरी सीमेच्या सुरक्षेत योगदान द्यायचे असेल, तर भारतीय तटरक्षक दलाने तुम्हाला एक उत्तम संधी दिली आहे. भारतीय तटकरक्षक दलात म्हणजेच इंडियन कोस्ट गार्डमध्ये नाविक पदांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. जनरल ड्युटी, डॉमेस्टिक ब्रॅच आणि (मॅकेनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स) पदांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. Indian Coast Guard Recruitment 2025

विशेष दहावी आणि बारावी पास तरुणांना नोकरी मिळविण्याची ही उत्तम संधी आहे. या भरतीद्वारे एकूण ६३० रिक्त जागा भरल्या जाणार आहे. या नोकरीसाठी तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. joinindiancoastguard.gov.in या वेबसाइटवर जाऊन तुम्ही अर्ज करु शकतात. अर्ज प्रक्रिया ११ जून २०२५ पासून सुरू झाली आहे आणि २५ जून २०२५ रोजी रात्री ११:३० वाजेपर्यंत चालेल. Indian Coast Guard Bharti 2025

भरतीसाठी पात्रता काय?
नाविक पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने गणित आणि भौतिकशास्त्र विषयांसह बारावी पास असणे गरजेचे आहे. सेलर (डॉमेस्टिक ब्रँच) पदासाठी उमेदवाराने दहावी पास असावे. मेकॅनिकल पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने १०वी/१२वी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. त्याचसोबत इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स किंवा टेलिकम्युनिकेशन इंजिनियरिंगमध्ये दोन किंवा चार वर्षांचा डिप्लोमा केलेला असावा.
वयाची मर्यादा : या नोकरीसाठी १८ ते २१ वयोगटातील उमेदवारांनी अर्ज करावेत.राखीव प्रवर्गासाठी वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे.
इतका पगार मिळेल: नाविक पदासाठी निवड झाल्यावर दर महिन्याला २१,७०० रुपये, मेकॅनिकल पदासाठी २९,२०० रुपये पगार मिळणार आहे.
अर्ज कसा करावा?
सर्वात आधी तुम्हाला joinindiancoastguard.cdac.in या वेबसाइटला भेट द्यायची आहे.
यानंतर होमपेजवरील CGEPT ०१/२०२६ आणि ०२/२०२६ बॅचसाठी ऑनलाइन अर्ज यावर क्लिक करा.
यानंतर रजिस्ट्रेशन करुन लॉग इन करुन खाते तयार करा. यानंतर सर्व माहिती भरुन कागदपत्रे अपलोड करा.












