Gold Rate : ट्रम्पचे टॅरिफ धोरण रद्द होताच सोने-चांदी दरात मोठा फेरफार; आताचे भाव पहा

मे 30, 2025 10:31 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० मे २०२५ । मागच्या काही दिवसापासून सोन्याचे दर वाढत असल्यामुळे सर्वसामान्यांना मोठी झळ सोसावी लागत आहे. मात्र जागतिक कळीचा मुद्दा बनलेल्या ट्रम्प टेरिफचे निर्णय अमेरिकन फेडरल कोर्टाने फेटाळून लावल्यानंतर सराफा बाजारात सोने दरात घसरण दिसून आली. मात्र चांदी दरात मोठी वाढ झाली.

gold silver 2 jpg webp

गुरुवारी सोने दरात ८०० रुपयांनी घसरण दिसून आली. त्यामुळे प्रति तोळा सोने आता ९८,८८० रुपयांवर स्थिरावले. तर दुसरीकडे चांदीत १ हजारांची वाढ झाल्याने १,०२,४८५ रुपयांवर पोहोचली. दरम्यान डॉलर निर्देशांकातील अस्थिरता, भू-राजकीय तणाव आणि अमेरिकेच्या प्रमुख आर्थिक डेटाच्या आधी आठवडाभरात सोने-चांदीच्या किमती अस्थिर राहण्याची अपेक्षा तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

जळगावच्या सराफ बाजारात
जळगाव सराफ बाजारात सोने नऊ दिवसांत २००० वाढून ९८,८८० रुपये प्रति तोळा तर चांदीच्या दरात एक हजारांनी वाढ होऊन ती १,०२, ४८५ रुपये किलोवर पोहोचली आहे. २१ मे पासून सलग नऊ दिवस चांदी लखपती आहे. २० मे रोजी ९९,९१० रुपये किलो असलेल्या चांदीचे दर २१ मे पासून १ लाखांवर आहे. त्यात २८ मे पासून सलग दोन दिवस १ हजारांची वाढ झाल्याने १,०२,४८५ रुपयांवर पोहोचली. तर २० मे रोजी ९६,७१७ रुपये तोळा असलेले सोने २९ मे रोजी तेजी मंदीनंतर ९८,८८० रुपयांवर पोहोचले आहे. या नऊ दिवसांत शुद्ध सोने २,००० रुपयांनी वाढले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment