इस्रोमध्ये नोकरी शोधणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतीय अंतराळ संशोधन संघटनेने (इस्रो) विविध पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले आहे. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया २७ मे २०२५ पासून सुरू झाली आहे. ऑनलाइन अर्ज भरण्याची शेवटची तारीख १६ जून २०२५ आहे. अर्ज करण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना isro.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल. या भरती प्रक्रियेद्वारे एकूण ३२० पदांवर उमेदवारांची नियुक्ती केली जाईल.

रिक्त पदांची माहिती-
१. शास्त्रज्ञ/अभियंता ‘एससी’ (इलेक्ट्रॉनिक्स) – ११३ पदे
२. शास्त्रज्ञ/अभियंता ‘एससी’ (मेकॅनिकल) – १६० पदे
३. शास्त्रज्ञ/अभियंता ‘एससी’ (संगणक विज्ञान) – ४४ पदे
४. शास्त्रज्ञ/अभियंता ‘एससी’ (इलेक्ट्रॉनिक्स) – पीआरएल – २ पदे
५. शास्त्रज्ञ/अभियंता ‘एससी’ (संगणक विज्ञान) – पीआरएल – १ पद

शैक्षणिक पात्रता-
अर्ज करण्यास इच्छुक उमेदवारांकडे इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन अभियांत्रिकी/मेकॅनिकल अभियांत्रिकी/संगणक विज्ञान अभियांत्रिकीमध्ये बीई/बी.टेक किंवा समकक्ष अभियांत्रिकी पदवी किमान ६५% गुणांसह (सर्व सेमिस्टरची सरासरी) किंवा १०-पॉइंट स्केलवर सीजीपीए ६.८४ असणे आवश्यक आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत अधिसूचनेत भरतीसाठी पात्रता आणि शैक्षणिक पात्रता तपासण्याचा सल्ला दिला जातो.
वयोमर्यादा-
अर्जदारांचे कमाल वय २८ वर्षे निश्चित करण्यात आले आहे. उमेदवारांचे वय १६ जून २०२०५ च्या आधारे मोजले जाईल. सरकारी कर्मचारी, माजी सैनिक; बेंचमार्क अपंगत्व श्रेणीतील उमेदवारांना कमाल वयोमर्यादेत सूट दिली जाईल.
जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा
अर्ज शुल्क-
अर्ज करण्यासाठी, उमेदवारांना २५० रुपये शुल्क भरावे लागेल. उमेदवार इंटरनेट बँकिंग / युनिफाइड पेमेंट इंटरफेस / डेबिट कार्ड (डोमेस्टिक) / क्रेडिट कार्ड (डोमेस्टिक) द्वारे ऑनलाइन शुल्क जमा करू शकतात.
पगार : ₹56,100/-
भरतीसाठी अर्ज कसा करावा-
सर्वप्रथम उमेदवाराला अधिकृत वेबसाइट isro.gov.in वर जावे लागेल.
यानंतर तुम्हाला होम पेजवर दिलेल्या अर्ज लिंकवर क्लिक करावे लागेल
आता तुम्हाला स्वतःची नोंदणी करावी लागेल.
यानंतर तुम्हाला लॉग इन करावे लागेल आणि अर्ज फॉर्म भरावा लागेल.
आता अर्ज फॉर्म तपासा आणि त्यानंतर तुमचे शुल्क भरा.
यानंतर अर्ज फॉर्म डाउनलोड करा आणि भविष्यातील वापरासाठी त्याची प्रिंट आउट घ्या.












