सर्वसामान्यांना दिलासा ! आज सोन्याचा तोळा घसरला, खरेदीपूर्वी वाचा आताचे भाव..

मे 23, 2025 12:38 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ मे २०२५ । गेल्या आठवड्यात घसरण झालेल्या सोने दरात या आठवड्यात मोठी वाढ झालेली दिसून आली. सोन्याचे दर आवाक्याबाहेर गेल्याने खरेदीदार सोने खरेदीकडे पाठ फिरवत आहेत. दरम्यान, आज सोन्याच्या किंमतीत घसरण झाली आहे. त्यामुळे खरेदीकरांना दिलासा मिळाला आहे. जर तुम्हीही खरेदीला सराफ बाजारात जाणार असाल तर त्यापूर्वी आताचे दर तपासून घ्या..

gold silver 2 jpg webp

२४ कॅरेट सोन्याचे दर
२४ कॅरेट सोने दरात आज ३८० रुपयांनी घट झाली आहे. यामुळे ८ तोळा सोन्याचे दर ७८,०२४ रुपये आहे. ३०४ रुपयांनी घट झाली आहे. त्यामुळे आज तुम्ही सोने खरेदी करु शकतात. खूप दिवसानंतर सोन्याचे दर कमी झाले आहेत.

२२ कॅरेट सोन्याचे दर
आज २२कॅरेट सोन्याचे दर ३५० रुपयांनी घसरले आहेत. १० ग्रॅम सोन्याचे दर ८९,४०० रुपये झाले आहेत. ८ ग्रॅम सोन्याची किंमत ७१,५२० रुपये आहे. या दरात २८० रुपयांनी कपात झाली आहे.१८ कॅरेट सोन्याच्या दरात २९० रुपयांनी घट झाली आहे. १८ कॅरेट सोन्याची किंमत ७३,१५० रुपये प्रति तोळा आहे. ८ ग्रॅम सोन्याचे दर ५८,५२० रुपये आहेत. जर तुम्हाला सोनं घ्यायचं असेल तर तुम्ही आज खरेदी केल्यावर तुम्हाला फायदा होणार आहे.

चांदीचे दर
आज चांदीच्या दरातदेखील कपात झाली आहे. आज ८ ग्रॅम चांदीचे दर ८०० रुपये आहे. १० ग्रॅम चांदीची किंमत १००० रुपये झाली आहे. चांदीच्या दरात थोड्याफार प्रमाणात घट झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment