जळगाव लाईव्ह न्यूज । ६ मार्च २०२५ । जळगाव शहरातून गेलेल्या महामार्गावर पुन्हा एक भीषण अपघात झाल्याची घटना समोर आलीय. शहरातील आकाशवाणी चौकात हा अपघात झाला आहे. या भीषण अपघातात दुचाकीवरील पती पत्नी गंभीर जखमी झाले आहे. विशेष म्हणजे या अपघातात पत्नीचा एक हात आणि एक पायाचा त्यांना चेंदामेंदा झाला आहे. रागिणी पाटील असे प्रकृती अत्यंत गंभीर असलेल्या महिलेचे नाव आहे.

दरम्यान, ही घटना घडल्यानंतर जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. 24 तासात महामार्गावर अपघाताची ही दुसरी घटना आहे. यावेळी वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती. जखमी झालेल्या दोघांना खाजगी वाहनातून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.